शब्दपूर्तीबद्दल ग्रामस्थांमधून समाधान
चिपळूण | प्रतिनिधी : तालुक्यातील डेरवण गुरववाडी येथील रस्त्याच्या कामाचे उद्घाटन नुकतेच आमदार शेखर निकम यांच्या हस्ते झाले. आ. निकम यांनी काही दिवसांपूर्वी दिलेल्या शब्दपूर्तीबद्दल येथील ग्रामस्थांनी आ. निकम यांचे आभार मानले आहेत.
डेरवण गुरववाडी येथील ग्रामस्थांनी काही दिवसांपूर्वी आमदार शेखर निकम यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. यावेळी त्यांनी डेरवण गुरववाडी येथील रस्त्यासंबंधीत व अन्य कामांचे निवेदन देवून डेरवण गुरववाडी रस्ता लवकरात लवकर करावा, अशी मागणी केली होती. यावेळी आमदार निकम यांनी ग्रामस्थांना रस्त्याचे प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते.
जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत डेरवण गुरववाडी रस्ता मंजूर करून रस्त्याचे काम पूर्ण झाले व डोंगरी विकास योजनेंतर्गत झालेल्या रस्त्याचे आमदार शेखर निकम यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
यावेळी ग्रामस्थांनी ढोल-ताशाच्या गजरात व फटाक्यांच्या आतिशबाजीत आमदार शेखर निकम यांचे स्वागत करून रस्त्याचे काम पूर्ण केल्याबद्दल व आपण दिलेले शब्द पूर्ण केल्याबद्दल आभार व्यक्त केले.
आपले मनोगत व्यक्त करताना आमदार शेखर निकम ग्रामस्थांना शिक्षण, सांस्कृतिक, कला, क्रिडा अशा विविध क्षेत्रात आवश्यक ती सर्वोत्तोपरी मदत करून डेरवण धरण दुरुस्त संदर्भातील समस्या मार्गी लावण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगितले.
यावेळी माजी पं.स.स. प्रकाश कानसे, कोकरे जि. प. गटाचे अध्यक्ष संजय कदम, डेरवण उपसरपंच देवेंद्र राजेशिर्के, नरेंद्र राजेशिर्के, किशोर राजेशिर्के, विलास चव्हाण, तात्या गुरव, निलेश गुरव, प्रमोद लकेश्री, आदेश यादव, जनार्दन यादव, भास्कर यादव, सुरेश गुजर, दत्ताराम यादव, प्रशांत राजेशिर्के आदी उपस्थित होते.











