वाटद-खंडाळा येथे परराज्यातील तरुणाची गळफास घेत आत्महत्या

रत्नागिरी ः प्रतिनिधी
तालुक्यातील वाटद-खंडाळा येथे परराज्यातील तरुणाने अज्ञात कारणातून राहत्या रुममध्ये गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना मंगळवार 8 जुलै रोजी सायंकाळी 6.45 वा.सुमारस उघडकीस आली.
हीरसिंग मसरसिंग रजपूत (21,मुळ रा.संचोर,जि.जालोर,राजस्थान सध्या रा.वाटदा-खंडाळा,रत्नागिरी) असे गळफास घेत आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. हीरसिंग रजपूत हा वाटद-खंडाळा येथील अंकूश तांबे यांच्याकडे भाड्याने रहात होता. मंगळवारी सायंकाळी त्याचे मामा तो रहात असलेल्या रुमवर गेले असता त्यांचा भाचा हीरसिंग रजपूतने रुमचा दरवाजा उघडला नाही. म्हणून त्याच्या मामांनी दरवाजा जोरात उघडून रुममध्ये प्रवेश केला असता त्यांना हीरसिंग हा बेडरुमच्या सिलिंग फॅनला टॉवेलने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. त्यांनी त्याला खाली उतरवून तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र वाटद-खंडाळा येथे उपचारांसाठी नेले असता तेथील वैद्यकिय अधिकार्‍यांनी हीरसिंगला तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी जयगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.