माजी नगरसेवक संताजी रावराणे यांच्या वतीने आयोजन
वैभववाडी | प्रतिनिधी : कणकवली, देवगड व वैभववाडी विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त वैभववाडीचे माजी नगरसेवक संताजी अरविंद रावराणे यांच्या वतीने दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थी यांचा गुणगौरव कार्यक्रम संपन्न होणार आहे. शुक्रवार दि. 23 जून रोजी सकाळी 11 वाजता येथील महाराणा प्रतापसिंह कलादालन सभागृहात हा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमाला जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा भाजपा सरचिटणीस मनोज रावराणे उपस्थित राहणार आहेत.
आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त संताजी रावराणे विविध उपक्रम राबवत असतात. मागील वर्षी वीज वितरणच्या सर्व कर्मचाऱ्यांना रेनकोट चे वितरण केले होते. कोरोना काळात गरीब व गरजू लोकांना मदतीचा हात त्यांनी दिला आहे.
याहीवर्षी आमदार साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या मार्फत विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच शहरातील सर्व मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमाला गुणवंत विद्यार्थी व पालक यांनी उपस्थित राहावे. असे आवाहन संताजी रावराणे यांनी केले आहे.












