आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसा निमित्त देवगड जामसंडे शहर भाजयुमो मार्फत जामसंडे साई दिर्बा मोटर ड्रायव्हिंग स्कूल येथे आयोजित केलेल्या मोफत टू व्हीलर लायसन्स कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला
या कार्यक्रमाला माजी आमदार अजित गोगटे, तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर, जिल्हा कार्यकारणी सदस्य संदीप साटम,उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सचिन पोलादे अभिजित शिरगावकर चैतन्य बकरे प्रवीण सातारे, भाजयुमो शहर अध्यक्ष दयानंद पाटील, माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर, भाजपा नगरसेवक पदाधिकारी उपस्थित होते
लायसन्स साठी 108 जणांनी अर्ज केले. 78 जणांची लायसन्स प्रक्रिया पूर्ण झाली
कॅम्प यशस्वी करण्यासाठी ड्रायव्हिंग स्कूल चे संचालक महेश भडसाळे मृणाली भडसाळे तौकीक शेख यांचे विशेष सहाय्य लाभले.
__________________________________________
लोकप्रिय आमदार नितेशजी राणे यांचा वाढदिवस देवगड तालुका भाजपातर्फे उत्साहात साजरा करण्यात आला यानिमित्ताने देवगड समुद्रकिनारी नगरसेविका तन्वी योगेश चांदोस्कर यांच्यावतीने १०० वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले
तसेच तालुका भाजपा आणि भाई पारकर यांच्यावतीने १० वी आणि १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच गरिब व गरजू होतकरू विद्यार्थ्यांनीना सायकलचे वाटप, रुग्णालयात फळे वाटप तसेच तहसिल कार्यालयात नागरिकांना विविध दाखल्यांना सहकार्य केले

भाजपा युवामोर्चा तालुकाध्यक्ष अमित साटम यांच्यामार्फत शिरगांव पंचक्रोशीमध्ये आधारकार्ड आणि विविध योजनांचे मोफत कॅम्प,तसेच युवामोर्चा शहराध्यक्ष दया पाटील यांच्यावतीने युवकांना मोफत टु व्हिलर लर्निंग लायसन्स कॅम्प, युवा कार्यकर्ता वैभव करंगुटकर यांच्यावतीने गरिब व गरजू विद्यार्थ्यांना वर्षभरासाठी शैक्षणिक खर्चासहित दत्तक घेण्याचा उपक्रम आदी उपक्रमांनी जल्लोषात वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी माजी आमदार अजितराव गोगटे,जिल्हा उपाध्यक्ष बाळ खडपे, अर्बन बँक अध्यक्ष सदाशिव ओगले,जिल्हा चिटणीस संदिप साटम, जिल्हा सचिव श्री प्रकाश राणे, मा.सभापती भाई पारकर,तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर,सरचिटणीस शरद ठुकरुल,संजय बांबुळकर, योगेश चांदोस्कर, प्रियंका साळस्कर, सावी लोके,विधानसभा सोशल मीडिया संयोजक वैभव करंगुटकर, युवा मोर्चा शहराध्यक्ष दया पाटील यांच्या सहीत सर्व आजी माजी पदाधिकारी-लोकप्रतिनिधी,कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते













