पखवाज विशारद परीक्षेमध्ये रथराज तुरीचे यश!

मसुरे | झुंजार पेडणेकर :आखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ मिरज – मुंबई, यांच्या वतीने घेतलेल्या पखवाज विशारद परीक्षेमध्ये मसुरे देऊळवाडा तुरी वायंगणी येथील कु. रथराज धोंडू तुरी हा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला . तो गुरुमाऊली जगन्नाथ संगीत विद्यालय मसुरे या विद्यालयात गुरुवर्य पखवाज विशारद श्री सचीन कातवणकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली त्याने पखवाज वादनाचे धडे घेतले. रथराजच्या या यशामध्ये वडील धोंडू शांताराम तुरी आई सुप्रिती धोंडू तुरी तसेच जगन्नाथ संगीत विद्यालयाचे संचालक पखवाज विशारद- डॉ. श्री दादा परब , बुवा भालचंद्र केळुसकर, पखवाज अलंकार- श्री महेशजी सावंत , पखवाज विशारद श्री दत्तप्रसाद (बाबू) खडपकर यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल माजी पं स सदस्य महेश बागवे, प्राथमिक शिक्षक श्रीकृष्ण बागवे, सरपंच सौ. सुचिता वायंगणकर, भजनी बुवा शिवा मेस्त्री, चंद्रकांत सावंत, संतोष मसुरकर, प्रकाश राणे, अनिल मेस्त्री यांनी अभिनंदन केले.