मसुरे | झुंजार पेडणेकर :देवगड तालुक्यातील मुणगे येथे श्री भगवती हायस्कूल मध्ये शालेय मंत्रिमंडळ निवडणूक मोठ्या उत्साहात आणि लोकशाही पद्धतीने पार पडली. विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुणांचा विकास व्हावा आणि त्यांना जबाबदारीची जाणीव व्हावी यासाठी ही निवडणूक आयोजित केली जाते.
निवडणुकीसाठी शाळेतील विद्यार्थ्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. यासाठी अनामत रक्कम जमा करण्यात आली होती.निवडणूक प्रक्रियेअंतर्गत प्रचार, मतदान आणि मतमोजणी यांचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी स्वतःचे जाहीरनामे तयार करून वर्गावर्गात प्रचार केला. शाळेतील शिक्षकांनी निवडणूक प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवले.
मतदानाच्या दिवशी शाळेतील वातावरण अगदी निवडणूक केंद्रासारखे वाटत होते. EVM अँप चा वापर केल्यामुळे विध्यार्थ्यांना विशेष गमंत वाटत होती.विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर मतदानात सहभाग घेतला. निवडणूक नंतर मतमोजणी करण्यात आली व विजयी विद्यार्थ्यांची घोषणा करण्यात आली.
विजयी विद्यार्थ्यांना शाळेतील विविध उपक्रमांचे आयोजन व शिस्त राखण्याची जबाबदारी दिली गेली आणि शाळेच्या वतीने सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन करण्यात आले.
यावेळी मुख्याध्यापिका एम. बी. कुंज, गौरी तवटे, हरिदास महाले, प्रसाद बागवे, रश्मी कुमठेकर,नामदेव बागवे, स्वप्नील कांदळ गावकर, सुविधा बोरकर, तेजल बागडे, मनोज मुणगेकर आदी उपस्थित होते.











