मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने माजी तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांचा शैक्षणिक उपक्रम*
गुहागर प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसनिमित्ताने शैक्षणिक साहित्याचे वाटप किंवा मुख्यमंत्री सहाय्यता निधीला आर्थिक सहकार्य करून करण्याचे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केले होते,त्यानुसार गुहागर तालुका भारतीय जनता पार्टीचे माजी अध्यक्ष निलेश सुर्वे यांनी पडवे आणि काताळे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील जिल्हा परिषद आदर्श शाळा तवसाळ नं १, तवसाळ अंगणवाडी,तांबडवाडी शाळा,बाबरवाडी शाळा,माध्यमिक विद्यालय पडवे,पडवे मराठी शाळा,काताळे शाळा नं.१,काताळे नवानगर शाळा,काताळे नवानगर उर्दु शाळा ,केंद्रीय शाळा पडवे उर्दु या ९ शाळांमधील २८५ विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप केले.
यावेळी काताळे ग्रामपंचायत सरपंच प्रियांका सुर्वे, पडवे ग्रामपंचायत सरपंच मुजीफ जांभारकर ,तवसाळ शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जगदीश गडदे, भाजपाचे तालुका उपाध्यक्ष विनायक सुर्वे, भाजप ज्येष्ठ कार्यकर्ते राजेश सुर्वे,पडवेचे विनायक भोसले,काताळे ग्रामपंचायत सदस्य मधुकर अजगोलकर, जैद भाटकर, माजी ग्रामपंचायत सदस्य लैबर जांभारकर, अंगणवाडी सेविका छाया सुर्वे, मदतनीस मनीषा मयेकर तसेच जि. प.आदर्श शाळा तवसाळ नंबर १ चे शिक्षक श्री राठोड, काताळे शाळा नंबर १ च्या मुख्याध्यापिका माधवी पाटील,श्री कांबळे, नवानगरचे गुरसुळे,पडवे शाळेचे पावरी, संजय राठोड, तवसाळ बाबरवाडी शाळेचे कोकाटे, तवसाळ तांबडवाडी शाळेचे संदीप भोई, साईनाथ पुजारा, पडवे माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक डी.बी. सूर्यवंशी, सहशिक्षक पी.जी. वेलुंडे, एस.एम.सूर्यवंशी, लिपिक राहुल कांबळे, प्रशांत सुर्वे, काताळे नवानगर उर्दूच्या मुख्याध्यापिका शाहीन मॅडम, उपशिक्षिका उजवा मॅडम, पडवे उर्दू केंद्राचे केंद्रप्रमुख परवेज अ.रशिद चिपळूणकर. मुख्याध्यापक महमद सलीम अजगर कारभारी,सह शिक्षक रमजान फुरकान जांभारकर, दाऊद साहेब हमीद जांभारकर, शिक्षण सेविका जुलेखा इरफान हातवडकर, रुखसार या.गनि मेमन आदींसह बहुसंख्य ग्रामस्थ या वह्या वाटपाच्या वेळी उपस्थित होते. माजी तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांच्या या स्तुत्य उपक्रमासाठी पदवीधर मतदारसंघाचे आमदार सन्मा.निरंजन जी डावखरे साहेब यांचे विशेष सहकार्य लाभले.
Home ताज्या घडामोडी भाजपाच्यावतीने काताळे-पडवे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील ९ शाळांमधील २८५ विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप











