विद्यामंदिर — हरकुळखुर्द या प्रशालेत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार !
फोंडाघाट | कुमार नाडकर्णी— विद्यामंदिर हरकुळखुर्द या प्रशालेत शालांत परीक्षा मार्च 2025 च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व पारितोषिक वितरण समारंभ नुकताच संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवन व स्वागत गीताने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक श्री यादव यांनी केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सरपंच, ग्रामपंचायत हरकुलळखुर्द श्री. राजन रासम यांच्या प्रमुख उपस्थितीत दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन करण्यात आले. व्यासपीठावर विठ्ठल रासम- अध्यक्ष, शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई,सर्वेश दळवी- उपसरपंच, सौ.आरती घाडी,पोलीस पाटील- आशुतोष रासम,अध्यक्ष,शालेय समिती तसेच गंगाधर रासम, अशोक रासम,अनिल सावंत,विद्याधर वालावलकर,विशांत रासम ,तानाजी रासम,बाबाजी दळवी, रोहित घाग, पांडुरंग रासम,धोंडी रासम,दत्तात्रय जोशी, राजेंद्र डिचवलकर व इत्यादी मान्यवर उपस्थित होते…
प्रशालेतून तसेच फोंडाघाट परीक्षा केंद्रातून प्रथम येण्याचा मान मिळवलेल्या स्वराली विलास भोसले -95.60%, हिचा सत्कार श्री गजानन रासम यांच्या हस्ते,द्वितीय क्रमांक संध्या तेली- 88.40%,हिचा सत्कार विठ्ठल रासम,तृतीय क्रमांक- कार्तिकी डोंगरे 85.40%, हिचा सत्कार सर्वेश दळवी यांचे हस्ते तसेच इतर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम व भेटवस्तू देऊन करण्यात आला. प्रशालेतून प्रथम येण्याचा मान मिळवलेल्या स्वराली भोसले हीने आपले मनोगत व्यक्त केले. तसेच धोंडी अण्णा,बाबाजी दळवी व विठ्ठल रासम यांनी, गुणवंत मुले शाळेचे भूषण असल्याचे सांगून मुलांचे अभिनंदन केले. तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सावंत मॅडम, गांगुर्डे सर आणि आभार प्रदर्शन पवार सर यांनी केले..










