कुडाळ तहसीलदार यांनी वालावल येथील ६ रॅम्प केले जमीनदोस्त

वाळू उत्खननाची बंदी असताना केली जात होती वाळू उपसा

कुडाळ प्रतिनिधी

कुडाळ तालुक्यातील वालावल येथील कर्ली नदीमध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर वाळू उपसावर तहसीलदार वीरसिंग वसावे यांनी कडक कारवाई केली या ठिकाणी असलेले अनधिकृत ६ रॅम्प उध्वस्त करून टाकले. या धडक कारवाईमुळे अवैध वाळू उपसा करणाऱ्या व्यावसायिकांना धडकी भरली आहे.
वाळू उपसाला बंदी असताना सुद्धा या जुलै महिन्यामध्ये वालावल कर्ली नदीमध्ये बेकायदेशीर वाळू उपसा बोटीद्वारे सुरू असल्याचे तहसीलदार वीरसिंग वसावे यांना माहिती मिळाल्यावर धडक कारवाई करण्यासाठी ते वालावल कर्ली नदीच्या ठिकाणी गेले वाळू उपसा करून डंपर मध्ये ही वाळू भरण्यासाठी करण्यात आलेले रॅम्प जेसीबीच्या साह्याने उध्वस्त करण्यात आले असे ६ रॅम्प उध्वस्त करण्यात आले. ही कारवाई तहसीलदार वीरसिंग वसावे यांच्यासह निवासी नायब तहसीलदार अमरसिंह जाधव, तलाठी श्रीमती मयेकर पोलीस पाटील यांच्या पथकाने केली. या कारवाईमुळे अवैध वाळू उपसा करणाऱ्या व्यावसायिकांना धडकी भरली आहे.