चिपळूण (प्रतिनिधी) : येथील नवकोंकण एज्युकेशन सोसायटीच्या डीबीजे महाविद्यालयात राष्ट्रीय छात्र सेना विभागाच्या वतीने ऑपरेशन विजय अंतर्गत विजय दिवस साजरा करणे तसेच शहिदांना मानवंदना देण्यासाठी महाविद्यालयात कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॅप्टन नम्रता माने यांनी केले.सुभेदार प्रदीप चाळके यांचे स्वागत प्राचार्य डॉ माधव बापट यांनी केले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त सुभेदार प्रदीप चाळके उपस्थित होते.यावेळी सुभेदार प्रदीप चाळके यांनी आपल्या मनोगतामध्ये कारगिल लढाईची पार्श्वभूमी सांगितली .आपले सैनिक इतकं पराक्रमी होते.ते केवळ शत्रु सैन्याशींच लढले नाहीत तर तेथील निसर्गाशी सुद्धा सामना करावा लागला.अशा कठीण परिस्थितीत त्यांनी विजय प्राप्त केला.यामुळे शूर हुतात्म्यांना मानवंदना देणे हे आपले परम कर्तव्य आहे. विशेष बाब म्हणजे श्री.चाळके हे स्वता: कारगिल युद्धभूमीवर कार्यरत होते. या कार्यक्रमाला उपप्राचार्य डॉ आर एम मोरे, उपप्राचार्य डॉ चेतन आठवले, उपप्राचार्य प्रा.सौ.स्नेहळ कुलकर्णी, लेफ्टनंट मधुसूदन माने तसेच १९ महाराष्ट्र बटालियन,६ महाराष्ट्र बटालियनचे छात्र,डाटा सायन्स व बायो टेक्नॉलॉजीचे विद्यार्थी उपस्थित होते.












