अलोरे हायस्कूल येथे योजनांचा जागर कार्यशाळा संपन्न

चिपळूण (प्रतिनिधी) : तालुक्यातील आलोरे प्रभागाची योजनांचा जागर कार्यशाळा नुकतीच अलोरे हायस्कूल येथे अलोरे प्रभागाच्या शिक्षण विस्तार अधिकारी सौरवी संतोष जाधव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. त्यांच्या हस्ते सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले.
या कार्यशाळेमध्ये केंद्र सरकार व राज्य सरकारच्या विद्यार्थ्यांसाठीच्या विविध योजनांचा उहापोह करण्यात आला. सुरुवातीला विस्तार अधिकारी सौरवी जाधव मॅडम यांनी शासनाच्या विविध योजनांचा विद्यार्थ्यांसाठी होणारा उपयोग सांगितला त्याचबरोबर एकही विद्यार्थी लाभाच्या योजनेपासून वंचित वंचित राहू नये हे सुचित केले. या कार्यशाळेमध्ये कोळकेवाडी केंद्राचे केंद्रीय प्रमुख भरत पावसकर यांनी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती, शिक्षण संचालनालय योजनाची माहिती आलोरे हायस्कूलच्या शिक्षिका श्रीमती जाककर मॅडम यांनी दिली. कोळकेवाडी नं.१ शाळेचे मुख्याध्यापक संकेश गायकवाड यांनी आदिवासी सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती तर शिरगाव व कळकवणे केंद्राचे केंद्रीय प्रमुख शेषराव गर्जे ज्यांनी समाज कल्याण शिष्यवृत्ती विषयी आपले विचार मांडले. पोफळी होडेवाडी शाळेचे मुख्याध्यापक आप्पासो मदने यांनी महाज्योती योजनांची माहिती दिली. यानंतर विस्तार अधिकारी जाधव मॅडम यांनी १३ मे २०२५ चा विद्यार्थी सुरक्षितता शासन निर्णय,नवभारत साक्षरता कार्यक्रम, PAT परीक्षा, शालेय समित्या एकत्रिकरण, यु डायस प्लस माहिती , आधार व्हलिडेशन ,अपार आय डी, PGI नोंदी, इको क्लब, निपुण महाराष्ट्र पडताळणी बाबत शासनाच्या मोफत योजना ५वी, ८वी शिष्यवृत्ती नियोजन, एक पेड मा के नाम, सोलर प्रकल्प उभारणी ,आनंददायी शनिवार, आयडॉल टीचरविषयी मार्गदर्शन केले. त्याचबरोबर शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अधिक प्रयत्न करण्याचे आवाहन शिक्षकांना केले. या कार्यशाळेसाठी अलोरे हायस्कूलचे मुख्याध्यापक सोळुंके सर प्राथमिक विभाग मुख्याध्यापिका योगिता लांजेकर, अलोरे प्रभागातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळांतील सर्व मुख्याध्यापक उपस्थित होते. संदीप शिंदे यांनी कार्यशाळेचे सूत्रसंचालन व सर्वांचे आभार मानले.