कर्करोग मोबाईल व्हॅन कणकवलीत | नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद!

कणकवली – महाराष्ट्र शासनाच्या सार्वजानिक आरोग्य विभागाची कर्करोग मोबाईल व्हॅन सोमवारी (आज ) ४ ऑगस्ट रोजी येथील कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाली होती. या व्हॅनमध्ये कर्करोग तपासणीच्या विविधा सुविधा उपलब्ध होत्या. यामध्ये मुख कर्करोग, स्तन कर्करोग, गर्भाशयमुख कर्करोग या तपासण्यांचा समावेश होता. या जनजागृती शिबिराचे उद्घाटन भाजपचे शहराध्यक्ष सुरेंद्र कोदे यांच्या हस्ते झाले. याला नागरिकांनी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

 

यावेळी डॉ. आदेश पालयेकर, डॉ. बोदमवाड

स्त्रीरोगतज्ञ, कणकवली उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विशाल रेड्डी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पूजा काळगे, डॉ. तुषार चिपळूणकर, श्रीम. सायली तिवरेकर, संतोष खानविलकर, केतन कदम, स्टाफ रेश्मा नानचे, सोनाली पावसकर, सोनिया तेली, वैशाख गोसावी, वैभव फाले, काका सावंत

तसेच उपजिल्हा रुग्णालय कणकवलीचे कर्मचारी, प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्यसेवक, आशा सेविका व कर्मचारी उपस्थित होते.