मसुरे | झुंजार पेडणेकर
डीसीए (डॉट कॉम असोसिएशन) या संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या जिल्हा स्तरीय परीक्षेमध्ये मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण सहाय्यक समिती संचालित, ओझर विद्या मंदिर कांदळगाव या प्रशालेतील विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश मिळविले आहे. इयत्ता सहावी साठी घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये शाळेतील कुमारी स्मृती उदय परब हिने २०० पैकी १५६ गुण मिळवून जिल्ह्यात पाचव्या स्थानी येण्याचा मान व गोल्ड मेडल पटकावले. त्याचप्रमाणे इयत्ता सहावी मध्ये २०० पैकी १२८ गुण मिळवून कुमार योगेश यशवंत आयकर व कुमारी आस्था सुरेंद्र बागवे यांनी जिल्ह्यात संयुक्त अठरावा क्रमांक मिळवून सिल्वर मेडल प्राप्त केले. इयत्ता सातवी साठी घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये शाळेतील कुमारी चिन्मयी राजेंद्र पारकर व कुमार कृष्णा राजन मेस्त्री यांनी ब्रांझ पदक मिळविले. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे या यशाबद्दल मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण सहाय्यक समिती मुंबईचे सर्व पदाधिकारी, शालेय समिती, मुख्याध्यापक, ओझर विद्या मंदिर, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, माता- पालक संघ, शाळा व्यवस्थापन समिती,माजी विद्यार्थी संघ, सर्व पालक व ग्रामस्थ यांच्यावतीने अभिनंदन करण्यात आले आहे.











