रत्नागिरी :
व्हिएतनाम येथील इंटरनॅशनल मॅजिक क्लब- क्लब मॅजिक जे टेन (CLUB MAGIC J 10) या संस्थेने एप्रिल/मे २०२३ मध्ये आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय जादू स्पर्धेत रत्नागिरीतील सुप्रसिद्ध जादूगार विनयराज उपरकर यांना हे सुयश प्राप्त झाले आहे. या स्पर्धेत भारत, फिलिपाईन्स व श्रीलंका येथील जादूगारांनी सहभाग घेतला होता.यापूर्वी इंटरनॅशनल ब्रदरहूड ऑफ मॅजिशियन (I B M. ) या संस्थेमार्फत घेतलेल्या आंतरराष्ट्रीय ऑनलाईन जादू स्पर्धेत त्यांना तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले होते.
नुकताच विनय यांचा वाढदिवस होऊन गेला एकप्रकारे त्यांना मिळालेली ही वाढदिवसाची भेटच म्हणता येईल. परंतु त्याबरोबरच हे वर्ष विनयराज यांचे गुरू व एकूणच जादू कलेतील अग्रगण्य असलेले जादूगार रघुवीर यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे. या वर्षामध्ये विनयराज यांना मिळालेला हा सन्मान म्हणजे गुरू आशिर्वाद म्हटल्यास अधिक संयुक्तिक ठरेल.
याच वर्षी त्यांना जादू परिषद,पुणे यांच्याकडून जादूविशारद व जादूभूषण हे सन्मान मिळाले होते. तर लखनौच्या वेलनेस फाऊंडेशन कडून राष्ट्रीय प्रतिष्ठा पुरस्कार मिळाला होता. मे महिन्यात झालेल्या गाबीत महोत्सवात गाबीत सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.








