सावंतवाडी : माजगाव गरड येथे पोलिसांनी एका पान दुकानावर छापा टाकून विविध ब्रँडचा गुटखा जप्त केला आहे. गुटखा विक्री करणाऱ्या योगेश बबन पेंडुरकर (वय ४१) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमळेकर पान शॉपमध्ये गुटखा विक्री होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी दुकानावर छापा टाकला. या छाप्यात दुकानातून ४०० पाउच विविध ब्रँडचा गुटखा आढळला. या गुटख्याची किंमत अंदाजे रुपये २६०० आहे.
पोलिसांनी तात्काळ हा गुटखा जप्त केला आणि पुढील कारवाईसाठी योगेश पेंडुरकर याच्यावर गुन्हा दाखल केला. ही कारवाई पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या पथकाने केली असून, शहरात अवैध धंद्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.











