ऐन गणेशोत्सवात तळवली परिसर सौरपथदीपानी उजळला व्हीरबॅक अनिमल हेल्थ इन इंडिया कंपनीचा स्तुत्य उपक्रम

वाडीवस्ती व सार्वजनिक ठिकाणी दिले तब्बल 32 पथदीप

गुहागर | प्रतिनिधी :
कोकणात सर्वात मोठ्या उत्साहाने साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवापूर्वी तळवली गावातील परिसर प्रकाशमय झाला आहे.त्यामुळे मुंबईतून गणपतीसाठी येणाऱ्या कोकणवासीयांचे स्वागत प्रकाशमय होणार आहे.मुंबईतील व्हीरबॅक अनिमल हेल्थ इन इंडिया कंपनीच्या माध्यमातून ग्रामपंचायतिच्या मागणीनुसार गावातील वाडीवस्तीवर व सार्वजनिक ठिकाणी तब्बल 32 सौर पथदीप लावण्यात आले आहेत.
तळवली ग्रामपंचायतकडून या पथदीपांसाठी सदर कंपनीकडे गावात सौर पथदीप बसविण्याची मागणी केली होती.यासाठी कंपनीच्या मॅनेजर मितल मदन कळंबाटे यांनी पुढाकार घेत कंपनीच्या सी.एस.आर.फंडातून हे पथदीप उपलब्ध करून दिले .सामाजिक कार्यकर्ते विजय कळंबाटे व बाळकृष्ण कांबळे यांच्या प्रयत्नातून हे सौर पथदीप गावात नुकतेच वाडीवस्तीवर व सार्वजनिक ठिकाणी बसविण्यात आले.ऐन गणेशोत्सव कालावधीत सौर पथदीप बसविण्यात आल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे