आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचे सेवाकार्य
शिवसेना शहरप्रमुख दीपक पाटकर यांचा महत्वपूर्ण पाठपुरावा
मालवण | प्रतिनिधी : आमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या माध्यमातून अखंडित सेवाकार्य सुरु आहे. आमदार निलेश राणे मोठया प्रमाणात विकासनिधी आणत आहेत. त्या सोबत काही वेळा नागरिकांच्या सेवेच्या दृष्टीने व प्रशासनाला सहकार्य म्हणून अनेक सेवा शिवसेनेच्या माध्यमातून स्वखर्चाने केल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मालवण शहरातील देऊळवाडा गणेश विसर्जन घाट येथे गणेश मूर्तींचे सुलभ विसर्जन व्हावे यादृष्टीने नागरिकांच्या मागणीनुसार या ठिकाणी मोठया प्रमाणात साचलेला गाळ शिवसेनेच्या वतीने आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी स्वखर्चाने उपसा करण्याची कार्यवाही केली आहे. यासाठी शिवसेना शहरप्रमुख तथा कार्यसम्राट माजी नगरसेवक दीपक पाटकर व माजी नगरसेवक जगदीश गावकर यांचा पाठपुरावा महत्वपूर्ण ठरला.
देऊळवाडा पुलानजीक मोठ्या प्रमाणात घरगुती गणपती बाप्पांचे विसर्जन होते. याठिकाणी गाळ साचल्याने येथे गणेश मूर्ती विसर्जित करताना समस्या निर्माण होऊ शकतात. याबाबत येथील नागरिकांनी शिवसेना शहर प्रमुख दिपक पाटकर यांचे लक्ष वेधले. त्यानुसार आमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनात शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी शिवसेनेच्या माध्यमातून गाळ काढण्याचे काम सुरु करून गणेश भक्त नागरिकांना दिलासा दिला आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत व देऊळवाडा येथील जेष्ठ नागरिक दशरथ कवटकर यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून या कामाचा शुभारंभ झाला.
यावेळी शिवसेना प्रवक्ते तथा मच्छिमार आघाडी जिल्हाप्रमुख राजा गांवकर, उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, उपजिल्हाप्रमुख विश्वास गांवकर, कुडाळ मालवण शिवसेना सोशल मीडिया प्रमुख किसन मांजरेकर, शिवसेना शहरप्रमुख दीपक पाटकर, माजी नगरसेवक जगदीश गावकर, उपतालुकाप्रमुख अरुण ताेडणकर, उपतालुका प्रमुख बाळू नाटेकर, युवासेना महीला जिल्हाप्रमुख साेनाली पाटकर, महीला उपतालुकाप्रमुख मधुरा तुळसकर, प्रियांका मेस्त्री, शहर संघटक राजु बिडये, निकीता ताेडणकर, अशाेक ओटवणेकर, प्रभाकर देऊलकर, दीगंबर बगाड, रवि कासले, रवि मालवणकर, शेखर डीचवलकर, सुभाष मालवणकर, शरद गावकर, कमलाकर गांवकर, विनायक खानोलकर, महेश बांदेकर, श्याम आजगावकर, राजु किर, बाबू गांवकर, बाळू मालवणकर, किरण चव्हाण, मिहीर दाभोळकर, गाेपाळ शेलटकर, किरण चव्हाण, भूषण राऊळ, नामदेव घाडी, बाबू कांदळकर, कृष्णा बांदेकर, बाबू आंब्रडकर, संतोष इब्रामपूरकर, रोहन वाळके, पांडया फणसेकर, हरेश फणसेकर, तोषक केळूसकर, प्रमोद मराळ यांच्यासह अन्य स्थानिक नागरिक तसेच शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते. गाळ उपसा काम मार्गी लागल्याबद्दल नागरिकांनी आमदार निलेश राणे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, शहरप्रमुख दीपक पाटकर, जगदीश गावकर यांचे आभार मानले आहेत.













