मसुरे (प्रतिनिधी ): मालवण तालुक्यातील बिळवस वरचा वाडा येथील दिगंबर (नाना ) हरी पालव (88 वर्ष ) यांचे वार्धक्याने निधन झाले. बिळवस ग्रामसेवा मंडळाच्या शैक्षणिक कार्यामध्ये त्यांचे मोलाचे सहकार्य होते. ते मंडळाचे संस्थापकीय सदस्य होते. तसेच सहचिटणीस या पदावर त्यांनी काम पाहिले होते. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. माजी ग्रामपंचायत सदस्य संतोष पालव आणि हरिश्चंद्र पालव यांचे ते वडील होत.













