सराईत चोरटा मध्यरात्री चोरीच्या प्रयत्नात असताना जेरबंद

लांजा: लांजा पोलीस ठाण्यात नोंद असलेला सराईत चोर मंगेश मनोहर पतियाने (वय ३७, रा. पुन्हासकोंड) याला १५ सप्टेंबर रोजी मध्यरात्री चोरी करण्याच्या उद्देशाने फिरत असताना रंगेहाथ पकडण्यात आले.
१५ सप्टेंबरच्या मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास मंगेश पतियाने लांजामधील वेरळसाई मंदिराच्या परिसरात संशयास्पदरीत्या फिरत होता. त्याची हालचाल पाहून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान, तो चोरीच्या तयारीत असल्याचे उघड झाले.
या प्रकरणी, पोलिसांनी तातडीने कारवाई करत त्याच दिवशी मध्यरात्री २ वाजून २९ मिनिटांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या अटकेमुळे परिसरातील चोरीच्या घटनांना आळा बसण्याची शक्यता आहे.