बांदा येथे उद्या महिला रोजगार मार्गदर्शन मेळाव
सिंधुदुर्ग भाजपा महिला मोर्चाचे आयोजन
बांदा : प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित सेवा पंधरवडा आणि विकास दिवसाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग भाजपा महिला मोर्चा तर्फे शुक्रवार १९ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ३.३० वाजता महिला रोजगार मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
बांदा मंडल मध्ये बांदा जिल्हा परिषद व इन्सुली जिल्हा परिषद स्तरावर महिला मेळावा आनंदी मंगल कार्यालय येथे होणार आहे. यावेळी मार्गदर्शक म्हणून लघु सूक्ष्म व मध्यम उद्योग मंत्रालयचे राष्ट्रीय सदस्य विजय केनवडेकर मार्गदर्शन करणार आहेत.
या कार्यक्रमाला भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा सरचिटणीस महेश सारंग, जिल्हा संयोजक प्रसन्ना देसाई, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कामत, बेसिकचे मंडळ अध्यक्ष, महिला मोर्चा मंडळ अध्यक्ष आणि महिला मोर्चा पदाधिकारी यांच्या उपस्थितीत मार्गदर्शन सोहळा संपन्न होणार आहे. महिला बचत गट प्रतिनिधी आणि इच्छुक महिलांनी या संधीचा फायदा करून उद्योगधंद्यामध्ये उन्नती साधावी, असे आवाहन भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सौ. श्वेता कोरगावकर यांनी केले आहे.












