भाजपा जिल्हा सरचिटणीस श्री. संदीप साटम यांच्या हस्ते शुभारंभ
आज दिनांक 20 सप्टेंबर 2025 रोजी भारतीय जनता पार्टी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री रवींद्र चव्हाण साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिरगाव टेलीमेडिसीन सेंटर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा शुभारंभ करण्यात आला. अशा प्रकारच्या टेलीमेडिसीन सेंटर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 20 सेंटर आहे त्यामध्ये शिरगाव मधील हे सेंटर गरजू लोकांना वरदान ठरत आहे या शुभप्रसंगी भाजपा जिल्हा सरचिटणीस श्री. संदीप साटम बोलत होते यावेळी शिरगाव उपसरपंच श्री संतोष फाटक, वैद्यकीय अधिकारी डॉ. अजित ढवळे, राजू शेट्ये,मंगेश लोके, सुभाष नार्वेकर, शैलेंद्र जाधव, शिरगाव पोलीस पाटील चंद्रशेखर साटम, सदानंद चव्हाण, महेश जाधव, संतोष जंगले, शरद फाटक, प्रथमेश लाड इत्यादी मान्यवर तसेच आरोग्य तपासणीसाठी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या उपक्रमाचे सर्वांनी कौतुक केले आणि चव्हाण साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.













