भारतीय क्रिकेटपटू के.एल. राहुल प्राईम व्हॉलीबॉल लीगमधील गोवा गार्डियन्स संघाचा सहमालक

 

व्हॉलीबॉल भारतासाठी ऑलिंपिकमध्ये यशाची कहाणी ठरू शकतो : के.एल. राहुल 

गोवा गार्डियन्स गोवा आणि कोकणातील, नव्या प्रतिभेला प्रोत्साहन व संधी देण्यासाठी कटिबद्ध

पणजी, सप्टेंबर २०२५: भारतीय क्रिकेटपटू के.एल राहुल यांनी आरआर केबल प्राईम व्हॉलीबॉल लीग पॉवर्ड बाय स्कापीयाच्या चौथ्या हंगामाआधी गोवा गार्डियन्सच्या मालकी गटात सामील होत भारतीय व्हॉलीबॉलसाठी नव्या पर्वाची सुरुवात केली आहे.

“व्हॉलीबॉलला आता योग्य तो सन्मान आणि व्यापक प्रेक्षकवर्ग मिळणे आवश्यक आहे. हा क्षण माझ्यासाठी एक फुल सर्कल अनुभव आहे. पीव्हीएल हा भारतातील व्हॉलीबॉलसाठी खऱ्या अर्थाने टर्निंग पॉईंट ठरणार आहे. आमचा मुख्य उद्देश म्हणजे या खेळाला अधिकाधिक स्क्रीन टाईम आणि प्रकाशझोतात आणणे आहे, जेणेकरून लोक केवळ पाहतीलच नाही तर त्यावर प्रेम करतील. समर्थक म्हणून नव्हे, तर सहमालक म्हणून गोवा गार्डियन्समध्ये सहभागी होणे माझ्यासाठी अत्यंत रोमांचक आहे. व्हॉलीबॉल हा मला नेहमीच प्रिय राहिला आहे आणि देशात या खेळाचा विकास साधण्यासाठी माझा आवाज आणि माझे योगदान देण्यास मी उत्सुक आहे,” प्रोफेशनल क्रीडा संघाचा सहमालक म्हणून प्रथमच पुढे येताना राहुल म्हणाले.

या ऑक्टोबरमध्ये चौथ्या हंगामात पदार्पण करणारा गोवा गार्डियन्स संघ, उच्च-ऊर्जा फॉरमॅटमध्ये इतर नामांकित फ्रँचायझींना टक्कर देणार आहे, जो खासकरून टेलिव्हिजन आणि डिजिटल प्रेक्षकांसाठी तयार करण्यात आला आहे.

“के.एल. राहुल आमच्या मालकी गटात सामील होत असल्याचा आम्हाला अत्यंत आनंद आहे. या खेळाबद्दल त्यांची आवड आणि त्याच्या प्रचंड क्षमतेवरील त्यांचा विश्वास, आम्हाला असे फ्रँचायझी उभारण्याची प्रेरणा देतो जे चाहत्यांना आकर्षित करेल आणि खेळाडूंना अधिक बळ देईल. व्हॉलीबॉल हा जगातील सर्वाधिक लोकप्रिय खेळांपैकी एक असून, योग्य संधी आणि व्यासपीठ मिळाल्यास तो भारतासाठी पुढील ऑलिंपिक यशोगाथा ठरू शकतो,” त्यांचे स्वागत करताना राजू चेकुरी, प्रिन्सिपल ओनर, गोवा गार्डियन्स आणि फाउंडर, नेटेनरिच यांनी सांगितले.

या लीगमधील सर्व सामने २ ते २६ ऑक्टोबर २०२५ दरम्यान सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर प्रसारित होतील आणि पीव्हीएलच्या यूट्यूब चॅनेलवर थेट प्रक्षेपित केले जातील.

“के.एल. राहुल यांचा पाठिंबा आमच्या स्वप्नाला नवे बळ देतो – भारताला ऑलिंपिकमध्ये व्हॉलीबॉल खेळताना पाहण्याचे. त्यांचा सहभाग निश्चितच अधिक चाहत्यांना जोडेल आणि देशातील या खेळाचा विकास आणखी वेगाने पुढे नेईल,” असे आरआर केबल प्राईम व्हॉलीबॉल लीग पॉवर्ड बाय स्कापीयाचे सीईओ जॉय भट्टाचार्य म्हणाले.