विलवडे गावच्या तंटामुक्ती अध्यक्षपदी कृष्णा(दादा )सावंत.

ओटवणे(प्रतिनिधी)         विलवडे गावची ग्रामसभा नुकतीच पार पडली असून या सभेत तंटामुक्ती अध्यक्षपदी माजी उपसभापती विलवडे गावचे जेष्ठ कृष्णा उर्फ दादा सावंत यांची फेरनिवड करण्यात आली.

यावेळी सरपंच प्रकाश दळवी,उपसरपंच विनायक दळवी, माजी उपसभापती विनायक दळवी, माजी सरपंच मोहन दळवी, हरिश्चंद्र दळवी, नंदकिशोर दळवी, ग्रामपंचायत अधिकारी आरती चव्हाण, सुरेश सावंत, प्रतिक दळवी, राकेश दळवी, शिल्पा धर्णे,, प्रमोद दळवी, सोनू गवस आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

कृष्णा सावंत हे गावातील अनेक सामाजिक धार्मिक उपक्रमात सक्रिय असणार व्यक्तिमत्व असून गावात त्यांच्या शब्दालाही मोठी किंमत दिली जाते राजकीय क्षेत्र असो किव्हा धार्मिक, सामाजिक क्षेत्र असो त्यांचा हातखंडा असून अनेक क्षेत्रात काम केल्याने त्यांचा या क्षेत्रातील अभ्यास ही आहे त्यामुळे पुनः त्यांच्यावर तंटामुक्ती अध्यक्ष पदाची जबाबदारी देवून ग्रामस्थांनी विश्वास टाकला. अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या.