रत्नागिरी : वाचन आणि साहित्य चळवळ वृध्दिंगत व्हावी, यासाठी कटिबध्द असलेल्या जनसेवा ग्रंथालय, लक्ष्मीचौक- रत्नागिरी यांच्यावतीने शनिवार दि.25 ऑक्टो. रोजी रत्नागिरीतील कवी, गझलकार विजयानंद जोशी यांच्या ‘थोडं कळत थोडं नकळत’ या काव्य संग्रहाचा प्रकाशन सोहळा व काव्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
रत्नागिरीतील राणी लक्ष्मीबाई सभागृह, शेरेनाका रत्नागिरी येथे सायं. 4 वा. हा कार्यक्रम होणार आहे. काव्यसंग्रहाचे प्रकाशक आणि साप्ताहिक कोकण मीडीयाचे संपादक प्रमोद कोनकर यांच्याहस्ते काव्यसंग्रहाचे प्रकाशन होणार असून त्यानंतर निमंत्रित कवींचे काव्यसंमेलन होणार आहे. यामध्ये कवी संजय कुळ्ये, शुभम कदम, नितीन देशमुख, अर्चना देवधर, अरुण मौर्य आणि विजयानंद जोशी सहभागी होणार आहेत. या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला व काव्यसंमेलनाला साहित्यप्रेमी, काव्यरसिक, वाचक, सभासद यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जनसेवा ग्रंथालयातर्फे करण्यात आले आहे.









