कुडाळ : शासनमान्य ग्रंथपालन प्रमाणपत्र परीक्षा २०२६ साठी प्रशिक्षणवर्ग येत्या ९ जानेवारी २०२६ पासून सुरू होणार असल्याची माहिती रा. ब. अनंत शिवाजी देसाई वाचनालय, कुडाळ यांच्या वतीने देण्यात आली आहे.
ग्रंथालयातील पुस्तकांची मांडणी, वर्गीकरण, तालिकिकरण, व्यवस्थापन अशा शास्त्रीय पद्धतींचे प्रशिक्षण या वर्गात दिले जाणार आहे. प्रशिक्षण वर्गाचे मार्गदर्शन रा. ब. अनंत शिवाजी देसाई वाचनालय (जिल्हा ग्रंथालय संघ, सिंधुदुर्ग) येथे होणार असून वर्गाचा कालावधी सहा महिने राहील.
वर्ग दर शनिवारी व रविवारी दुपारी घेतले जाणार असून, प्रशिक्षणार्थींनी आपले अर्ज लवकरात लवकर सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. मर्यादित जागा असल्यामुळे पात्र उमेदवारांनी त्वरित संपर्क साधावा.
अधिक माहितीसाठी श्री. राजन पाचगव्हे (मो. क्र. ९४२३०३१५९५) यांच्याशी संपर्क साधावा.











