मसुरे | प्रतिनिधी : देवगड तालुक्यातील मुणगे येथील प्रसिद्ध जेष्ठ व्यापारी श्री. दिगंबर बापू वळंजु (90 वर्ष) यांचे वार्धक्याने निधन झाले. ‘भाई ‘ या टोपण नावाने ते प्रसिद्ध होते. आपल्या मनमिळावू स्वभावाने ते परिचित होते. गावात होणाऱ्या विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. त्यांच्या पश्चात भाऊ, भावजय, दोन मुलगे, तीन मुली, जावई, सुना, पुतणे, नातवंडे, असा परिवार आहे. मुणगे येथील प्रसिद्ध व्यापारी गणेश वळंजु, माजी पंचायत समिती सदस्य प्रमोद वळंजू यांचे ते वडील, जेष्ठ व्यापारी वसंत वळंजू यांचे भाऊ तर मुणगे हायस्कुल तिठा येथील आनंद स्टोअर्सचे आनंद व केदार वळंजू यांचे काका होत. शुक्रवारी अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.











