खेड – ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ, खेड (रत्नागिरी) संचालित कै. प्रभाकर गजानन कांबळे ज्ञानदीप विद्या मंदिर (माध्यमिक विभाग) आणि कै. श्रीमती राधाबाई चंदुलाल तलाठी ज्ञानदीप विद्या मंदिर (उच्च माध्यमिक विभाग), भडगाव येथे शालांतर्गत विज्ञान प्रदर्शन अत्यंत उत्साहात पार पडले. 6 वी ते 8 वी आणि 9 वी ते 12 वी अशा दोन गटांमध्ये हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.
विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन संस्था सदस्य रुपल पाटणे, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक राजकुमार मगदूम सर आणि प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका पूर्वा मोरे मॅडम यांच्या हस्ते झाले. उद्घाटनप्रसंगी परीक्षक, शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वर्षीच्या प्रदर्शनात एकूण 61 प्रतिकृती विद्यार्थ्यांनी सादर केल्या. इयत्ता 6 वी ते 8 वी गटातील प्रतिकृतींचे परीक्षण अक्षय महाजन सर (ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल, मोरवंडे–बोरज) आणि विजय शिंदे सर (श्री रामचंद्र धोंडशेट पाटणे ज्ञानदीप विद्या मंदिर, भडगाव) यांनी केले. तर इयत्ता 9 वी ते 12 वी गटातील प्रतिकृतींचे परीक्षण शिल्पा आग्रे मॅडम आणि अभिजित शेळके सर यांनी केले.
6 वी ते 8 वी गटात इयत्ता 7 वीचे श्लोक जोगळे आणि स्वानंद कोकरे यांच्या ‘भूकंप सूचक यंत्र’ या प्रतिकृतीने प्रथम क्रमांक पटकावला. इयत्ता 7 वीच्या श्रेया गीते, स्नेहा कदम आणि पूजा पवार यांच्या ‘कचरा व्यवस्थापन’ या प्रतिकृतीला द्वितीय क्रमांक मिळाला. तृतीय क्रमांक इयत्ता 7 वीची भूमी भिंगारे हिच्या ‘गणितीय मनोरंजन’ या प्रतिकृतीने मिळवला. तसेच उत्तेजनार्थ क्रमांक पार्थ मुंडे–समर्थ जाधव यांच्या ‘जलविद्युत निर्मिती’ आणि शर्ली खेडेकर–भार्गवी पवार यांच्या ‘थिप डिटेक्टर’ या प्रतिकृतींना जाहीर करण्यात आले.
9 वी ते 12 वी गटात इयत्ता 11 वी JEE चे विराज होडे आणि देवेश राऊत यांच्या ‘Dnyandeep AI’ या अभिनव प्रतिकृतीने प्रथम क्रमांक मिळवला. इयत्ता 11 वी CET मधील मयुरेश कोवळे आणि सोहम वैद्य यांच्या ‘Sunlight Tracker’ या प्रतिकृतीने द्वितीय क्रमांक पटकावला. तर इयत्ता 9 वीची कीर्ती मुंढे हिच्या ‘Biodegradable Plastic’ या प्रतिकृतीने तृतीय क्रमांक मिळवला. उत्तेजनार्थ क्रमांक स्पर्शिका पांढरे–राजनंदिनी सावंत यांच्या ‘Mathematical Model’ आणि आर्श मेस्त्री, प्रथमेश लोंढे आणि सोहम टिळेकर यांच्या ‘Emerging Technology’ या प्रतिकृतींना देण्यात आला.
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी विनोद टेंबे आणि अश्विनी पाटील यांनी मोलाची मेहनत घेतली. विज्ञान प्रदर्शनातील विद्यार्थ्यांच्या उत्साहाचे आणि सृजनशीलतेचे कौतुक करत संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी, उपाध्यक्ष डॉ. रमणलाल तलाठी, सरचिटणीस माधव पेठे, खजिनदार विनोद बेंडखळे, विश्वस्त दीपक लढ्ढा, पेराज जोयसर, भालचंद्र कांबळे, संस्थापक सरचिटणीस प्रकाश गुजराथी, संस्थापक सदस्य चंदन पाटणे, प्रफुल्ल महाजन, अनिल शिवदे, रुपल पाटणे आणि सल्लागार मंडळ सदस्य तसेच ज्ञानदीप परिवारातील सर्व मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक व कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.













