रत्नागिरीत भगवान वराह जयंती उत्साहात साजरी

रत्नागिरी :
भगवान श्री विष्णूंच्या दशावतारांपैकी एक अवतार असलेल्या भगवान वराह जयंती रत्नागिरीमध्ये उत्साहात साजरी करण्यात आली.

हिंदू धर्मात वराह जयंतीला महत्वाचे स्थान आहे. त्यामुळे दरवर्षी वराह जयंती मोठ्या उत्साहात साजरी करून हिंदू विचारधारा समाजात रुजविण्याचे आवाहन मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी केले होते. तर जगतगुरू नरेंद्राचार्य महाराज यांच्यासह अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी याला दुजोरा दिला होता. देशासह राज्यामध्ये विविध ठिकाणी हि वराह जयंती साजरी करण्यात आली. ना. राणे यांनीही विश्व हिंदू क्रांती संघटना, नवी मुंबई यांच्या वतीने आयोजित भगवान वराह जयंती कार्यक्रमास उपस्थित राहून हिंदू धर्म आणि समाजाच्या कल्याणासाठी प्रार्थना केली.

त्याप्रमाणे रत्नागिरीतील मारुती मंदिर येथेहि सकल हिंदू समाज तर्फे भगवान वराह जयंती साजरी करण्यात आली. यावेळी वराह देवाची पूजा करण्यात आली. त्यानंतर आरतीला सुरुवात झाली आरतीच्या शेवटी घंटानाद करण्यात आला. यावेळी संग्राम दळी, राकेश नलावडे, देवेंद्र झापडेकर, अक्षत सावंत, अमेय पाडावे, रोहित भुजबळराव आणि भक्तगण उपस्थित होते. सर्वानीच धर्म रक्षणासाठी भगवान वराहकडे प्रार्थना केली.