एस एस पी एम अभियांत्रिकी महाविद्यालयातील 42 विद्यार्थ्यांची क्यू स्पायडर कंपनीमध्ये प्रशिक्षणासाठी निवड

एस एस पी एम इंजिनिअरिंग कॉलेजच्या कंप्यूटर इंजीनियरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, मेकेट्रोनिक्स इंजीनियरिंग या विभागाच्या 42 विद्यार्थ्यांची क्यू स्पायडर कंपनीमध्ये प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे. सदरची निवड प्रक्रिया विद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर डी एस बाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल व क्यू स्पायडर कंपनी यांच्यामार्फत राबवण्यात आली होती.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांना या कंपनीमार्फत आयटी क्षेत्रामध्ये अद्ययावत कौशल्य विकसित करण्यासाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे. निवड प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने पार पडली यामध्ये ॲप्टिट्यूड व ग्रुप डिस्कशन या फेऱ्यांमधून विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आयटी क्षेत्रातील नामांकित कंपन्यांमध्ये काम करण्यासाठी लागणारी कौशल्य विकसित होऊन विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल असा विश्वास प्राचार्य डॉ. डी एस बाडकर यांनी व्यक्त केला. एस पी एम कॉलेज ऑफ इंजीनियरिंग कणकवली सन 1999 पासून संस्थापक खासदार माननीय नारायणरावजी राणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व अध्यक्षा सौ नीलम ताई राणे उपाध्यक्ष आमदार डॉ. निलेश राणे, सचिव आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली समाजातील विविध स्तरावरील विद्यार्थ्यांना शिक्षण व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत आहे. सदर प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्षा सौ नीलम ताई राणे, अध्यक्ष आमदार डॉ. निलेश राणे, सचिव कॅबिनेट मंत्री नितेश राणे, डॉ. डी एस बाडकर डकर, सर्व विभाग प्रमुख, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.