ओटवणे (प्रतिनिधी ) ओटवणे गावच्या रहिवासी गंगाबाई भिकाजी म्हैसकर वय 82 यांचे शुक्रवारी सायंकाळी 4 च्या दरम्यान गोवा बांबूळी येथे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.त्यांची अचानक तब्बेत खालवल्या मुळे त्यांना गोवा बांबूळी येथे नेण्यात आले होत मात्र उपचाराला साथ देत नव्हत्या यातच त्यांचे निधन झाले. पच्छात तीन मुली एक मुलगा, सून,जावई,नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. कोलगाव वि. का. संस्थेचे गटसचिव रामा उर्फ बाळू म्हैसकर यांच्या त्या मातोश्री होय.












