मुसळधार पावसात रस्त्यावर उडतेय कारंजे!

गावखडी | वार्ताहर 

रत्नागिरी शहरासाठी देण्यात आलेली नळ पाणी योजना किती यशस्वी झाली याचे दाखले सातत्याने शहरवासियांना मिळत आहेतच. पाणी टंचाईचा सामना करतानाच फुटणाऱ्या पाईप लाइन आणि त्यातून वाया जाणारे हजारो लिटरचे पाणी सर्व सामान्यांच्या डोळ्यात पाणी आणत होतेच. तेव्हा तीव्र तापमांनामुळे हे घडत असल्याचे सांगितले गेले.

आता भर पावसात सुद्धा पाईप लाइन मधून कारंजे उडत असून हे डोळ्याचे पारणें फिटवाणारे दृश्य रत्नागिरी शहरातील साळवी स्टॉप येथील आहे.