देवगड :प्रतिनिधी
जल्लोषची अलोट गर्दी, नेत्रदिपक रोषणाई, आतषबाजी, अनेकविध स्टॉल आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम यांनी बहरलेला जल्लोष हा कार्यक्रम देवगड तालुका व्यापारी पर्यटन संस्थेच्यावतीने ३० आणि ३१ डिसेंबर रोजी देवगड बीच येथे आयोजित करण्यात आला आहे.
मंगळवार दि. ३० डिसेंबर रोजी या कार्यक्रमाला सुरूवात होणार असून रात्री ८ वाजता या कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरविकास मंत्री ना. नितेश राणे यांच्या हस्ते होणार आहे.कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्षा साक्षी प्रभू, तहसिलदार आर.जे.पवार, बंदर अधिकारी योगेश चोडणेकर, प्र.मुख्याधिकारी गौरी पाटील, उद्योगपती प्रकाश गायकवाड, जिल्हा व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर, अण्णा घेवारी, देवगड तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष शैलेश कदम आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
देवगड बीच येथे सुरू होणाèया जल्लोष कार्यक्रमामध्ये खवय्यांसाठी फुडस्टॉल, लहान मुलांसाठी अनेक खेळ व मनोरंजनात्मक कार्यक्रम यांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन झाल्यानंतर रात्री ९ वाजता महाराष्टड्ढाची हास्यजत्रा फेम अमिर हडकर यांच्या बॅण्ड मेजर ए यांचा म्युझिकल शो यामध्ये अबोली गिèहे आणि मुनव्वर अली या गायकांचा सहभाग असून साहेबा यांचा परफॉर्मर होणार आहेत.
बुधवार दि. ३१ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजता जल्लोष २०२६ या कार्यक्रमामध्ये गायक अनुष्का शिकतोडे, आदिश तेलंग व ढोलकीचा तालावर फेम नृत्यांगणा गौरी जाधव यांचा बहारदार कार्यक्रम होणार असून रात्री १२ वा.फटाक्यांचा आतषबाजीने नववर्षाचे स्वागत करीत खास आकर्षण असलेल्या डि.जे.नाईटस् या कार्यक्रमाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे.













