रस्त्यावरील झाड जैसेच्या तैसे एका बाजूने वाहतूक सुरू
न्हावेली | प्रतिनिधी
सावंतवाडी मळेवाड मार्गावर रेल्वे स्टेशन येथे काजूचे झाड पडल्याने काही तास वाहतूक ठप्प होती. अद्याप रस्त्यावरील झाड तसेच असून एका बाजूने वाहतूक सुरू आहे.सावंतवाडी वेंगुर्ला मार्गावरून रेल्वेस्टेशनकडे जाणाऱ्या वळणावररून काही अंतरावर हे झाड पडल्याने रात्रीच्या वेळेस अपघात होण्याची शक्यता टाळता येत नाही. संबधित विभागाने तात्काळ दखल घेऊन रस्त्यावरील झाड बाजूला करून रस्त्या वाहतुकीसाठी मोकळा करावा.












