दापोली प्रतिनिधी :
ऐश्वर्यसंपत्र श्री संत भगवानबाबा वैराग्यपूर्वी पू वामनभाऊ महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित संयुक्त स्मृतिसोहळा शनिवार, दिनांक 11 जानेवारी रोजी दापोली येथे अत्यंत भक्तीमय व उत्साहपूर्ण वातावरणात साजरा झाला. कार्यक्रमाची सुरुवात पद्मश्री दादा इदाते यांच्या शुभहस्ते प्रतिमेचे पूजन करून झाली.यावेळी पद्मश्री दादा इदाते यांनी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत कैलेल्या कार्याच्या आठवणी सांगत उपस्थितांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळी संस्थेच्या अध्यक्षा संपदा पारकर यांनी वंजारी समाजातील अधिकारी आज विविध क्षेत्रांत कार्यरत दिसत आहेत, ही समाजासाठी अभिमानाची बाब आहे असे मत व्यक्त केले. दापोलीतील पेन्शनर असोसिएशनच्या सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी डॉ.भारत कराड, प्राचार्य, वराडकर महाविद्यालय, दापोली (जि.रत्नागिरी) यांनी शिक्षण, स्पर्धा परीक्षा आणि वंजारी समाजातील तरुण अधिकारी कसे पुढे आले याविषयी मार्गदर्शन केले. डॉ. सुवर्णा कराड, प्रदेशाध्यक्ष वंजारी महासंघ महिला आघाडी, महाराष्ट्र राज्य यांनी कुटुंब व्यवस्था सुदृढ ठेवा, मुलांना शिक्षण द्या. समाजाचा अभिमान बाळगा आणि मी वंजारी आहे हे निर्भयपणे सांगा असे विचार मांडले.
सायंकाळी ह. भ. प. सुदर्शन महाराज शास्त्री याच्या प्रभावी प्रवचनाने कार्यक्रमाला अध्यात्मिक ऊंची दिली. महाराजांनी ‘देव कुणाला प्रत्यक्ष दिसत नाही या विषयावर मार्गदर्शन करत देव कुठे व कुणाला दिसतो हे एका पतिव्रतेच्या उदाहरणांसह समजावून सांगितले. शिक्षणाच्या महत्त्वावर बोलताना एक हृदयस्पर्शी उदाहरण दिले. महाराज म्हणाले, एका कार्यक्रमात एका अशिक्षित वडिलांना विचारले तुमची तिन्ही मुले डॉक्टर कशी झाली? तेव्हा त्या वडिलांनी उत्तर दिले मी भगवानगडाचा वारकरी आहे. बाबांनी आम्हाला सांगितले होते एकर विका पण लेकर शिकवा मी साडेचार एकर जमीन विकली आणि मुलांना शिकवले म्हणूनच माझी मुले डॉक्टर झाली या उदाहरणातून महाराजांनी समाजाला शिक्षणाचा मार्ग स्वीकारण्याचा संदेश दिला या सोहळ्याचे उद्दिष्ट म्हणजे कोणताही औपचारिक अध्यक्ष नाही अथवा संयोजक
नसतानाही सर्वांनी मिळून सामूहिक नियोजन व आयोजन केले. दापोली परिसरातील वंजारी समाजातील अनेका अधिकारी, कर्मचारी, कार्यकर्ते सहकुटुंब मोठ्या संख्येने उपस्थित होते. या पुण्यतिथी सोहळ्यासाठी अनेक दानशूर भाविकांनी सहकार्य केले. त्यामध्ये प्रमुख सहभागी म्हणून श्री किशोर नागरगोजे,प्रा.डॉ प्रकाश सानप, शिवाजी बांगर,सुनील कारखेले,गोकुळ घुले, अतुल दगडखैर, बाळासाहेब कराड, सोपान मुंडे, रामेश्वर कातकडे, नागनाथ नागरगोजे , शिवनाथ नाकाडे, सिद्धेश्वर पाळवदे , संतोष वारे, बाबासाहेय पालवे , अनंत गर्जे, बाबा जाधवर, पुंडलिक केंद्रे, गोपीनाथ मुंडे, श्रीकांत बडे, अंकुश खेडकर, पोपट खाडे, नारायण केंद्रे, आप्पासाहेब गर्जे, संतोष बड़े, ज्ञानेकर नागरे, परमेश्वर बड़े अशोक वणवे, भाऊसाहेब दराडे, संतोष मुंडे, प्रदीप घुगे, अनिल नागरगोजे, संभाजी फड, रमेश चाटे, वाल्मिक पालवे, माणिक सांगळे, बालाजी जायभाये,मारोती कराड, लता पाटील, देविदास गोल्हार ,नामदेव बडे,गोविंद दराडे, राहुल बडे, विजयकुमार राख,अशोक पालवे, मनोहर मुंडे, योगेश गंभीरे, पप्पू चेमटे आदी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.












