महेश इंगळे – प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते संपन्न झाली श्री गणेशाची महाआरती.
अक्कलकोट | प्रतिनिधी : येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने मंदिरातील पुरातन कालीन गणेश मंदिरात श्री गणेश जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी श्री गणेशास पंचामृत अभिषेक करण्यात आले. तदनंतर सकाळी ११:३० वाजता मंदिर समितीचे चेअरमन व भारतीय जनता पार्टीचे तथा फिक्स नगरसेवक महेश इंगळे यांच्या
अधिपत्त्याखाली मंदार महाराज पुजारी, मोहित पुजारी यांच्या मंत्रोच्चारात विधिवत पूजा व महेश इंगळे – प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते श्री गणेशाची महाआरती करून गणेश जयंती अत्यंत भक्तीभावात साजरी करण्यात आली. या प्रसंगी अनेक भाविक उपस्थित होते. गणेश जयंतीनिमित्त मंदिर समितीच्या वतीने उपस्थित हजारो भाविकांना शिरा प्रसाद वाटप करण्यात आले, उपस्थित सर्व भाविकांनी या प्रसादाचा लाभ घेतला. गणेश जयंतीचे औचित्य साधून दिवसभर हजारो भाविकांनी श्री गणेशाचे व स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. याप्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, उज्वलाताई सरदेशमुख, प्रा.नागनाथ जेऊरे, अमर पाटील, नागनाथ गुंजले, सागर गोंडाळ, महेश मस्कले, प्रसाद सोनार, संजय पवार, श्रीशैल गवंडी,
श्रीपाद सरदेशमुख, गिरीश पवार,
सिध्दाराम कुंभार, प्रा.शिवशरण अचलेर,
प्रसाद पाटील सर, सुनिल पवार, दर्शन घाटगे, बाळासाहेब एकबोटे, तुषार मोरे, रविराव महिंद्रकर, स्वामीनाथ लोणारी, गणेश इंगळे, विपूल जाधव आदींसह देवस्थानचे कर्मचारी, सेवेकरी व गणेशभक्त, स्वामीभक्त उपस्थित होते.











