ग्रामीण भागतील जनतेच्या जीवनात परिवर्तन घडविण्यासाठी निवडणूकीच्या रिंगणात -प्रफुल्ल सुर्वे

पर्यटन व्यवसायातुन रोजगार निर्मितीसाठी काम करणार

राजापूर (प्रतिनिधी ): ग्रामीण भागातील जनतेला आजही रस्ते, विज, पाणी, शिक्षण, आरोग्य व स्वच्छता यांसारख्या प्रश्नांसाठी झगडावे लागत आहे. या प्राथमिक सेवा सुविधा अधिक सक्षम करतानाच ग्रामीण भागातील जनतेच्या जीवनात परिवर्तन घडविण्यासाठी आपण या निवडणूकीच्या रिंगणात असल्याचे पेंडखळे पंचायत समिती गणातील अपक्ष उमेदवार प्रफुल्ल हनुमान सुर्वे यांनी नमुद केले आहे.
आजही ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरू आहे. सोयीसुविधा नसल्याने योग्य प्रकारे नियोजन नसल्याने महावितरणमधील कंत्राटी कामगारांचे अपघाती मृत्यू होत आहेत. हे थांबविण्यासाठी विद्युत विभागाकडील पुरातन, नादुरुस्त यंत्रणा बदलण्याची गरज असून यासाठी शासनाकडे पाठवपुरावा करून आद्ययवत यंत्रणानी सुसज्ज विद्युत विभाग करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. जेणेकरून २४ तास विजपुरवठा सुरू राहिल व याचा लाभ जनतेला शेती आणि शेती पूरक व्यवसायासाठी होणार आहे.
कोकणातील निसर्ग संपत्तीचा प्रचार आणि प्रसार करून पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी देण्यासाठी आपण प्रयत्न करू. पर्यटकांची सुरक्षा, त्यांना अपेक्षित असंणाऱ्या सुखसुविधा निर्माण करून सिधुदुर्ग, अलिबाग सारखा पर्यटन राजापुरात उभारणे व यातुनही मोठया प्रमाणात रोजगार उपलब्ध करून कसे देता येतील याकडे लक्ष देण्याचा आपला मानस आहे. तर राजापूर तालुक्यातील समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आधुनिक व्यवस्था निर्माण करतानाच समुद्र पर्यटन वाढविणे जे कोकणातील अर्थव्यवस्थेला अधिक चालना देईल यासाठी प्रयत्न करणार आहे.
खास करून महिलांना food industry चे प्रशिक्षण देऊन त्यांचे व्यावसायिक गट उभारणे, त्यांच्या कडून कोकणी उत्पादने तयार करून त्या उत्पादनाना बाजारपेठ उपलब्ध करून देणे यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. तर कोकणातील प्रमुख अर्थव्यवस्था म्हणजे हापूस आंबा, काजू व इतर कोकणी रानमेवे यांच्यासाठी फळप्रक्रिया उद्योगाचे महत्व समजावून तरुणांना त्या क्षेत्राकडे वळण्यासाठी एक योजना तयार करण्याचा आपला मानस असल्याचे सुर्वे यांनी सांगितले.