रत्नागिरी | प्रतिनिधी : येथील गायन समाज देवल क्लबतर्फे आयोजित गोविंदराव गुणे स्मृति हिंदूस्थानी ख्याल गायन स्पर्धेत रत्नागिरीच्या चैतन्य विराज परब याने दुसरा कमांक पटकावला. स्पर्धेचे यंदाचे तिसावे वर्ष आहे. ही स्पर्धा कोल्हापुरातील गायन समाज देवल क्लब सभागृहात रंगली. सविस्तर निकाल पुढीलपमाणे, प्रथम- आकाश पंडित (बेळगाव), तृतीय- केतकी घारपुरे (कल्याण), उत्तेजनार्थ : वैष्णवी जोशी ( रत्नागिरी), श्रीहरी कुलकर्णी (विजापूर), निकेता लेले(पुणे), मुक्ता मिसर( गोवा)
चैतन्यने स्पर्धेत बिलासखानी तोडी रागातील बडा व छोटा ख्याल सादर केला. गोगटे – जोगळेकर महाविद्यालयात वाणिज्य शाखेच्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या चैतन्यचे संगीताचे सुरूवातीचे शिक्षण आई विनया परब यांच्याकडे झाले. सध्या तो किराणा घराण्याचे नामवंत गायक पं. जयतीर्थ मेवुंडी यांच्याकडे तालीम घेत आहे.
वंदना आठल्ये, माधुरी काळे व मंगला जोशी यांनी परीक्षण केले.या ख्याल गायन स्पर्धेत यापूर्वी मंजिरी असनारे, विश्वजीत बोरवणकर, पुष्कर लेले, रमाकांत गायकवाड, देवश्री नवघरे, पूजा बाक्रे, प्राजक्ता मराठे या नामवंत गायकांनी प्रथम कमांक पटकावला आहे.