वेंगुर्ले येथे मासिक पाळी स्वच्छता व्यवस्थापन या विषयावर महिलांना मार्गदर्शन..

वेंगुर्ले : प्रतिनिधी
रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिड टाऊन क्लब तर्फे वेंगुर्ले येथे महिला सक्षमी करणांतर्गत महिलांच्या मासिक पाळी स्वच्छता व्यवस्थापन या विषयावर महिलांना एक चांगला मार्गदर्शनपर उपक्रम घेण्यात आला. यावेळी एमएचएम च्या श्रीमती शिवानी चोप्रा यांनी उपस्थित महिलांना मासिक पाळी स्वच्छता व्यवस्थापन या विषयावर सखोल मार्गदर्शन केले.

महिला या  मासिक पाळी च्या वेळी अजूनही जुन्या पद्धतीचा वापर करतात शिवाय काही महिला या सॅनिटरी पॅड चा वापर करतात. त्याचे दुष्परिणाम काय होतात, पर्यावरणाच्या दृष्टीने कश्याप्रकारे नुकसान होत याबाबत महिलांना उपयुक्त व मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी मा. शिवानी चोप्रा यांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या महिलांना मोफत मेनस्ट्रूयल कप चे वाटप केलं. यावेळी या कार्यक्रमासाठी महिलांनी चांगल्या प्रकारे उपस्थिती दाखवून उस्फुर्त प्रतिसाद दिला. हा कार्यक्रम घेण्यासाठी रोटेरियन सौ. श्वेता हुले यांनी खूप परिश्रम घेतले.

रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिड टाऊन चे अध्यक्ष रो. आनंद बोवलेकर, पोलिओ चेअरमन रोटेरियन डॉ . वसंतराव पाटोळे, रोटेरियन श्वेता हुले व इतर सदस्य यावेळी उपस्थित होते. तसेच इनरव्हिल क्लब अध्यक्षा सौ. पूनम बोवलेकर व अन्य इनरव्हील क्लब सदस्य  तसेच लायनेस क्लब अध्यक्षा सौ. केरकर  मॅडम, सौ. उर्मिला सावंत व त्यांचे इतर सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्या रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिड टाऊन व इनरव्हिल क्लब वेंगुर्ला तर्फे मा. शिवानी चोप्रा यांचा शाल श्रीफळ व भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिड टाऊन या वतीने रो. डॉ .वसंतराव पाटोळे व लायनेस क्लब च्या वतीने सौ.राखी दाभोलकर यांनी सर्वांचे आभार मानले. तसेच पोलिओ व वर्ल्ड ग्रेटेस्ट मील डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी राजेश घाटवळ यांनी सायक्लिस्ट शिवानी चोप्रा यांचा मांडवी वेंगुर्ला कांदळवन सफारी महिला बचत गटाच्या महिलांच्या उपस्थितीत, पोलिओ सन्मानचिन्ह देऊन, रोटरी एंड पोलिओ – पोलिओ मुक्त जग रोटरी संदेश त्यांच्या गोवा ते सुरत सायकल रॅलीतून सर्वदूर पोहचविण्यासाठी शुभेच्छा दिल्या.क्लब सेक्रेटरी डॉ राजेश्वर उबाळे यांनी आभार मानले.