आंगणेवाडीत आज ‘जादू तेरी नजर’ नाट्यप्रयोग!

मसुरे | झुंजार पेडणेकर :    आंगणेवाडी नाट्य मंडळ मुंबई यांच्या वतीने आज 12 फेब्रुवारी रोजी रात्री साडेदहा वाजता रत्नाकर मतकरी लिखित ‘जादू तेरी नजर’ हा तुफान विनोदी नाट्य प्रयोग श्रीदेवी भराडी बाई रंगमंचावर होणार आहे. या नाटकाचे दिग्दर्शक महेश सावंत पटेल, नृत्य दिग्दर्शक हिमांगी सुर्वे यांनी केले आहे. उपस्थितीचे आवाहन आंगणे कुटुंबीय आंगणेवाडी यांनी केले आहे.