साकेडी (प्रतिनिधी) : माझी वसुंधरा अभियानांतर्गत निसर्गाशी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांची राज्यस्तरीय स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत १ हजार ते १.५ हजार लोकसंख्या गटामध्ये साकेडी ग्रामपंचायतीने राज्यात प्रथम क्रमांक पटकावत गावाचा नावलौकिक वाढवला आहे.
स्पर्धेत मिळालेले मानचिन्ह साकेडी गावचे ग्रामदैवत लिंगेश्वर पावणाई मंदिर येथे नेण्यात येणार असून त्यानंतर तेथून ग्रामपंचायत साकेडी कार्यालयात आणण्यात आले. असंख्य ग्रामस्थांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला सरपंच सुरेश साटम, ग्रामपंचायत अधिकारी,कृषी अधिकारी यांच्या उपस्थितीत आणि सर्व सदस्य आणि गावातील मानकरी यांच्या उपस्थितीत या पुरस्काराचे स्वागत करण्यात आले.












