चिवेली पंचक्रोशीच्या वतीने १ मार्च रोजी आयोजन
चिपळूण (वार्ताहर ) : चिवेली पंचक्रोशीतील नागरिकांच्या वतीने उमरोली जिल्हा परिषद गटातील एक जि. प. सदस्य आणि दोन पंचायत समिती सदस्य यांचा जाहीर नागरी सत्कार समारंभ रविवार दिनांक १ मार्च रोजी दुपारी ३.३० वाजता आदर्श विद्यामंदिर चिवेली येथे आयोजित करण्यात आला आहे.
उमरोली जिल्हा परिषद गटातून मतदारांनी ज्या उमेदवारांवर विश्वास दर्शवत त्यांना निवडून दिले. यावेळी मतदारांनी सजगता दाखवली. उमरोली जिल्हा परिषद गटातून प्रमोद निवळकर निवडून आले. उमरोली गणातून गौरव पाटेकर आणि गुढे गणातून सौ सुप्रिया वंजारे हे सदस्य निवडून आले आहेत. या तिन्ही उमेदवारांचा नागरी सत्कार समारंभ चिवेली पंचक्रोशी मधील ग्रामस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. रविवार १ मार्च रोजी दुपारी ३.३० वाजता हा कार्यक्रम आदर्श विद्यामंदिर चिवेलीच्या प्रांगणात होणार आहे. होळीच्या सणातच सत्कार समारंभाचा गुलाल उधळत तिन्ही उमेदवारांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात येणार आहेत.
या कार्यक्रमाला गुहागर विधानसभेचे आ भास्कर जाधव आणि जिल्हा परिषद सदस्य विक्रांत जाधव यांची उपस्थिती लाभणार आहे. या जाहीर नागरी सत्कार समारंभ कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थितीत रहावे, असे आवाहन रमेश शिर्के यांनी केले आहे.













