रत्नागिरी : शहरातील पटवर्धन हायस्कूलचे माजी शिक्षक भिकाजी बाळकृष्ण बडे यांचे सोमवार २ मार्च २०२६ रोजी मध्यरात्री दापोली येथील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. निधनासमयी ते ८३ वर्षांचे होते.
भिकाजी बडे हे सेवानिवृत्तीनंतर गेली अनेक वर्षे दापोली येथे वास्तव्यास होते. रत्नागिरी शहरातील पटवर्धन हायस्कूलमध्ये त्यांनी मराठी, इतिहास आणि पीटी शिक्षक म्हणून सेवा बजावली. विद्याथीर्र्प्रिय, मिश्कील स्वभाव असलेले बडे सर शिस्तबद्ध म्हणूनही परिचित होते. गेले काही महिने ते आजारी होते. त्यातच सोमवारी मध्यरात्री २.३० वा.च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. दापोली ब्राह्मणवाडी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी दापोली शहर परिसरातील नातेवाईक, ग्रामस्थ व रत्नागिरीतील नातेवाईक उपस्थित होते. त्यांच्या निधनामुळे शोक व्यक्त करण्यात येत आहे. भिकाजी बडे यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, वहिनी, पुतण्या, पुतणी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.












