मसुरे | झुंजार पेडणेकर :मसुरे कावावाडी येथील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री देव हनुमान मंदिराचा १६ वा वर्धापन दिन सोहळा आणि हनुमान जन्मोत्सव निमित्त १ एप्रिल ते ४ एप्रिल २०२६ या कालावधीत विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
१ एप्रिल रोजी
सकाळी ८:३० वा.: लघुरुद्र अभिषेक,
सकाळी १०:३० वा. सत्यनारायण महापूजा,व तीर्थप्रसाद,
रात्री ९:०० वा. नाट्य मंडळाच्या ७५ व्या वर्षानिमित्त दीपप्रज्वलन,
रात्री १०:०० वा.: मसुरे भंडारी समाज सेवा संघ निर्मित संगीत ऐतिहासिक नाटक ‘व्यंकोजी वाघ’ नाट्य प्रयोग.
२ एप्रिल २०२६ हनुमान जन्मोत्सव
पहाटे ४:३० वा.: ह.भ.प. श्री. अक्षय परुळेकर (वायरी मालवण) यांचे कीर्तन,
पहाटे ६:०० वा. श्री देव हनुमान जन्म, पालखी सोहळा आणि महाआरती,
दुपारी १:०० वा. महाप्रसाद (भंडारा),
सायंकाळी ४:०० वा. सत्यनारायण महापूजा व तीर्थप्रसाद,
रात्री ८:०० वा. अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त वाडीतील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार,
रात्री ९:३० वा. स्थानिक महिला व मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम.
३ एप्रिल २०२६
रात्री ८:०० वा. जय हनुमान प्रासादिक भजन मंडळ, मसुरे कावा यांच्या वतीने ‘ट्रीक्सीन युक्त महादिंडी नृत्य’ कार्यक्रम,
रात्री १०:३० वा. स्नेहभोजन,
४ एप्रिल २०२६
सायंकाळी ७:०० वा. श्री देव मारुतीरायाची महाआरती,
रात्री ८:०० वा.: शैक्षणिक कार्यक्रम (इयत्ता १० वी व १२ वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार),
रात्री १०:०० वा.: वाळवेश्वर दशावतार नाट्य मंडळ, तेंडोली यांचा भव्य दशावतारी नाट्यप्रयोग ‘पंचमुखी हनुमान. उपस्थितीचे आवाहन करण्यात आले आहे.













