दापोली येथुन बेपत्ता झालेल्या निलीमा चव्हाण चा मृत्यू घातपातच; नाभिक समाजाची सखोल चौकशीची मागणी

निलीमाच्या मारेकरीचा शोध १० दिवसात न लागल्यास १५ आँगस्ट पासुन उपोषण

दापोली l प्रतिनिधी: चिपळुण येथील २४ वर्षीय निलिमा चव्हाण हिचा घातपातच झाला असल्याचा दाट संशय तिच्या नातेवाईकांनी व्यक्त केला असून या संदर्भात पोलिसांनी कसून चौकशी करावी. निलिमाच्या मारेकरांचा 12 ऑगस्ट 2023 पर्यंत शोध पोलिसांकडून घेतला गेला नाही, तर कोणत्याही प्रकारची पूर्वसुचना न देता रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व नाभिक समाज बांधव हे 15 ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनापासून उपोषणाला बसतील आणि मग त्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, तर पोलीस प्रशासनच त्याला जबाबदार राहील, असा थेट इशाराच दापोली पोलीस ठाण्यात निवेदन देत जिल्ह्यातील नाभिक समाज बांधवांनी दिला आहे.

 

*चिपळुण येथे मुळ गावी निघालेल्या निलीमा पोहचली नसल्याने दापोली पोलिस स्थानकात तक्रार दाखल*

 

चिपळूण तालूक्यातील मूळ गाव ओमळी येथील रहिवाशी असलेली निलीमा सुधाकर चव्हाण ही स्टेट बँक ऑफ इंडियाच्या दापोली शाखेत कार्यरत होती. ती शनिवारी दि. 29 जुलै 2023 रोजी दापोलीहून घरी ओमळी ता. चिपळूण येथे येण्यास निघाली, पण ती ओमळी गावी तिच्या घरी पोहोचलीच नाही. त्यामुळे तिच्या नातेवाईकांनी निलिमा बेपत्ता झाल्याची तक्रार दापोली पोलीस ठाण्यात दाखल केली होती. दरम्यानच्या काळात दि. मंगळवारी 1 ऑगस्ट 2023 रोजी निलिमाच्या वयाचे साधर्म्य असलेला एक अनोळखी स्त्री देहाचा मृतदेह दापोली तालुक्यातील उसगाव येथील जे.एस.डब्ल्यू जेटी खाडीच्या पाण्यात तरंगत असल्याचे आढळून आले.

 

*जे.एस. डब्ल्यू जेटीच्या खाडीच्या पाण्यात सापडून आल्याने मोठी खळबळ*

 

दापोली येथे स्टेट बँक आँफ इंडिया येथे कंत्राटी पदी काम करणाऱ्या निलीमा चव्हाण ही

दापोली येथून चिपळूण ओमळी येथील आपल्या घरी जायला निघालेली तिच्या घरी पोहोचली नव्हती. यासाठी तिच्या नातेवाईकांनी निलिमा बेपत्ता झाल्याची तक्रार दापोली पोलीस ठाण्यामध्ये दाखल केली होती. त्यानुसार दापोली पोलिसांचा शोध सुरू असतानाच तिचा मृतदेह दापोली तालुक्यातील दाभोळ सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उसगाव येथील जे.एस. डब्ल्यू जेटीच्या खाडीच्या पाण्यात सापडून आल्याने मोठीच खळबळ उडाली.

 

 

*जे.एस.डब्ल्यू जेटी खाडीच्या पाण्यात मृतदेह तरंगत असल्याची माहिती मिळताच दाभोळ पोलिसांची घटनास्थळी धाव*

जे.एस.डब्ल्यू जेटी खाडीच्या पाण्यात मृतदेह तरंगत असल्याची माहिती मिळताच

दाभोळ सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार पाचपुते यांनी आपल्या पोलीस सहकाऱ्यांसह उसगाव येथील घटना स्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला. यावेळी उसगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच मृदुळा मिलिंद गोयथळे, उपसरपंच चेतन रामाणे, मिलिंद गोयथळे, आगरवायंगणी ग्राम पंचायतीचे सरपंच संतोष आंबेकर, उसगाव तंटामुक्त अध्यक्ष उपस्थित होते. घटनेचा पंचनामा झाल्यानंतर मृतदेहाच्या शवविच्छेदनासाठी तिचा मृतदेह दापोली उप जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. दरम्यान बेपत्ता झालेल्या निलिमा सुधाकर चव्हाण हिचा हा मृतदेह आहे का ? याबाबत चौकशी सुरू झाली असता तिच्या नातेवाईकांनी हा मृतदेह निलिमाचाच असल्याची ओळख पटवून सांगितले.

 

 

*जिल्ह्यातील नाभिक समाजाची दापोली उपजिल्हा रुग्णालयात धाव*

 

निलिमा आयुष्य संपविण्यासारखे टोकाचे पाऊल उचलेल, असे तिच्या नातेवाईकांना वाटत नाही. हा घातपातच असल्याचा तिच्या नातेवाईकांनी संशय व्यक्त केला आहे. नातेवाईकांनी केलेल्या संशयाचा छडा लागण्यासाठी जिल्हा भरातील नाभिक समाज एक झाला असून दापोली उपजिल्हा रुग्णालयात जिल्ह्यातील रत्नागिरी, चिपळूण, खेड, मंडणगड, संगमेश्वर, गुहागर, दापोली आदी ठिकाणच्या तालुक्यातील समाज बांधवांनी धाव घेत नातेवाइकांना धीर देत त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आणि त्यांनी दापोली पोलीस ठाण्यात निवेदन दिले.

 

*समाज बांधवांकडून पोलिसांना निवेदन*

नाभिक समाजाने पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, निलीमा सुधाकर चव्हाण ही उच्चशिक्षित, सद्वर्तनीय मुलगी होती. निलिमा ही दापोलीतून खेड येथे (एस. टी. स्टॅडला) गेल्याचे सी. सी. टीव्हीत दिसत आहे. त्याच बरोबर खेडमध्ये एका मुली बरोबर चिपळूणला जाण्याच्या गाडीतसुद्धा सी. सी. टीव्हीत दिसत आहे. त्यानंतर ती बेपत्ता झाली. असून तिचा मोबाईल बंद दाखवत होता, मात्र तपास यंत्रणेने तपासात तिचे मोबाईल लोकेशन दि. 29 जुलै 2023 रोजीचे ठिक 12.05 ला रात्री रेल्वे स्थानक अंजनी येथे दाखवत होते. त्यानंतर मात्र बंद दाखवत होते. हे संशयास्पद होते. त्या मुलीचा मृतदेह ज्या स्थितीत मिळाला त्यामध्ये पाण्यात मृतदेह राहिला, तरी एवढया प्रकारे देहाचे डोक्यावरील केस पूर्ण नष्ट होणे, डोळयावरील भुवया पूर्ण नष्ट होणे हे सर्व मृतदेहाची ओळख पटू नये या दृष्टीने केलेली छेडछाड होती, असे आमचे ठाम मत असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्या मुलीवर कोणत्यातरी अज्ञात इसमाने अथवा इसमांच्या समूहाने पाळत ठेवून अतिप्रसंग करून त्यानंतर तिची ही स्थिती करून तो मृतदेह पाण्यात फेकला असावा हे स्पष्ट जाणवत आहे. त्या दृष्टीने त्याचा वरिष्ठ यंत्रणांमार्फत कसून तपास होणे आवश्यक असल्याची मागणी रत्नागिरी जिल्हा नाभिक समाज बांधव यांच्याकडून करण्यात आली आहे

 

 

*दहा दिवसांत प्रकरणाचा छडा नाही लागला तर १५ आँगस्ट पासुन उपोषणाचे हत्यार*

 

या घटनेची चौकशी झालीच पाहिजे. 12 ऑगस्टपूर्वी आरोपींना बेड्या ठोकण्यास पोलीस प्रशासन अपयशी ठरले, तर संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातील नाभिक समाज बांधव हे 15 ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनापासून उपोषणाचा मार्ग पत्करतील आणि मग यावेळी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाच, तर त्याला पोलीस प्रशासनच जबाबदार असेल असे सांगितले.

 

 

*डि.वाय. एस.पी.मुगणेकर नी दापोली उपजिल्हा रुग्णालयात जावुन घेतली नातेवाईक यांची भेट*

दरम्यान मृत्यु प्रकरणी खेड डि.वा.एस.पी श्री.मुगणेकर यांनी काल दापोली उपजिल्हा रुग्णालयात जावुन निलिमाच्या नातेवाईक व समाज बांधवांची भेट घेत निवेदन स्विकारण्यात आले असुन या गोष्टींची सखोल चौकशीचे आश्वासीत केले.

 

 

*दापोलीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार*

पोलिसांनी ओमळी वासियांबरोबर समस्त उपस्थित नाभिक बांधवांना नीलिमाला व तिच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिल्यानंतर पोलीस व उपस्थित नागरिक यांच्या समन्वयाने अखेर पावणेतीन वाजता मौजे दापोलीजवळील स्मशानभूमीत नीलिमावर अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

 

 

दापोली पोलिसांसमोर आवाहन

 

निलीमा चव्हाण चा मृत्यूने पोलिसांसमोर आवाहन निर्माण केले आहे. तिची दोन दिवसा मधील वेगवेगळ्या ठिकाणी असलेली मोबाईल लोकेशनच्या आधारे व सी.सी.टि.व्ही. फुटेजच्या माध्यमातून शोध घ्यावा लागणार आहे. दापोली पोलिसांसमोर निलीमाच्या मृत्यूचा तपास लावणे आवाहन ठरणार आहे.