जागतिक कमाईत अभूतपूर्व यश
आठवड्यागणिक विक्रम मोडत चित्रपटाची आगेकूच
आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर 2: द रिव्हेंज’ या चित्रपटाने जागतिक बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला आहे. रणवीर सिंगच्या प्रमुख भूमिकेतील हा चित्रपट 1000 कोटी रुपयांचा निव्वळ टप्पा पार करणारा पहिला हिंदी चित्रपट ठरला आहे. भारतातच या चित्रपटाने 1034 कोटींहून अधिक कमाई केली असून जागतिक स्तरावर 1700 कोटींच्या दिशेने त्याची वाटचाल सुरू आहे. सलग आठवडे दमदार कामगिरी करत चित्रपटाने अनेक मोठे विक्रम मोडीत काढले आहेत.
नवी दिल्ली : आदित्य धर दिग्दर्शित हेरगिरीवर आधारित ‘धुरंधर 2: द रिव्हेंज’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर विक्रमी कामगिरी करत आहे. रणवीर सिंग मुख्य भूमिकेत असलेल्या या चित्रपटाने 21 व्या दिवशी 1000 कोटी रुपयांचा निव्वळ टप्पा पार केला आहे. या कामगिरीमुळे तो हा विक्रम करणारा पहिला हिंदी चित्रपट ठरला आहे.
चित्रपटाने देशांतर्गत बाजारात 1034 कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली असून जागतिक स्तरावर 1700 कोटींच्या लक्ष्याकडे त्याची वाटचाल सुरू आहे. ‘जवान’, ‘केजीएफ 2’ आणि ‘बाहुबली 2’ सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांना मागे टाकत या चित्रपटाने नवा इतिहास घडवला आहे.
पहिल्या आठवड्यातच या चित्रपटाने 674 कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यानंतर दुसऱ्या आठवड्यातही दमदार कामगिरी करत एकूण कलेक्शन 900 कोटींच्या पुढे गेले. दिवसागणिक सातत्यपूर्ण कमाईमुळे चित्रपटाची गती कायम राहिली आहे.
21 व्या दिवशी चित्रपटाने सुमारे 1.55 कोटी रुपयांची कमाई केली असून एकूण नेट कलेक्शन 1034.92 कोटींवर पोहोचले आहे. सलग 20 दिवसांच्या मजबूत कामगिरीनंतरही चित्रपटाची कमाई सुरूच आहे.
चित्रपटाची कथा RAW एजंट जसकीरत सिंग रंगीच्या मिशनभोवती फिरते. रणवीर सिंगच्या दुहेरी भूमिकेतील अभिनयाचे विशेष कौतुक होत आहे. संजय दत्त, अर्जुन रामपाल आणि यामी गौतम यांच्याही भूमिका महत्त्वाच्या ठरल्या आहेत.










