लांजा ग्रामीण रुग्णालय तसेच महिलाश्रम लांजा येथे
फळवाटप
लांजा (प्रतिनिधी): रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त लांजा तालुका भाजपाच्या वतीने आज शनिवारी महिला आश्रम,लांजा ग्रामीण रुग्णालय तसेच कोंडये येथील वृद्धाश्रम या ठिकाणी फळवाटप व धान्यवाटप कार्यक्रम राबविण्यात आला.
खासदार नारायण राणे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त लांजा तालुका भाजपाच्या वतीने आज शनिवारी लांजा ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे महिलाश्रम लांजा या सेवाभावी संस्थेतील मुलांना खाऊ वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे कोंडये येथील वृद्धाश्रमात धान्य वाटप करण्यात आले. तर शिरवली येथील आश्रमामध्ये मुलांना खाऊ वाटप करण्यात आले.
सर्व कार्यक्रमांना भाजपाचे लांजा तालुका अध्यक्ष शैलेश खामकर, विराज हरमले, चंद्रकांत खामकर, जिल्हा कार्यकारिणी श्रीकृष्ण हेगिष्ट्ये,
, विजय कुरूप, शेखर सावंत, अनिल पन्हळेकर, रवींद्र राणे, सुनील गुरव, श्रीमती दाभोळकर, भक्ती शेट्ये, शारदा गुरव, तुकाराम प्रिंदावणकर, मधुकर पालये, आदी कार्यकर्ते उपस्थित होते










