शिरगाव येथील रक्तदान शिबिरात रक्तदात्यानी जोपासली सामाजिक बांधिलकी

शिरगाव येथील रक्तदान शिबिरात रक्तदात्यानी जोपासली सामाजिक बांधिलकी

शिरगाव (वार्ताहर)
शिरगाव येथील रक्तदान शिबिरात २५ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली
देवगड तालुक्यातील शिरगाव येथील राजे ग्रुप शिरगाव, संदीप साटम मित्र मंडळ शिरगाव,आर.के.फाऊंडेशन शिरगाव, आणि सिंधुरक्तमिञ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग शाखा देवगड यांच्या संयुक्त विद्यमानाने गुरुवारी प्राथमिक आरोग्य केंद्र शिरगाव येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले यावेळी या रक्तदान शिबिरात उत्तम प्रतिसाद लाभला असून २५ रक्तदात्यानी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली.
यावेळी राजे ग्रुपचे अध्यक्ष हेमंत देसाई, संदीप साटम मित्रमंडळाचे अध्यक्ष संदीप साटम, आर के फाउंडेशनचे अध्यक्ष अमित साटम, ग्रामपंचायत सदस्य मंगेश धोपटे,मंगेश लोके,सिंधुरक्तमिञ प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे उपसचिव रविकांत चांदोस्कर , देेवगड शाखेचे सचिव प्रकाश जाधव ,सदस्य महेश शिरोडकर, प्रसाद दुखंडे,शिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ.ओमप्रकाश रामटेके ,डाॅ.दुर्गेश गुंगेवाड तसेच आदी समाजिक संस्थेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
हे रक्तदान शिबिर सुरु असतानाच जिल्हा रुग्णालयातील पाच वर्षाच्या मुलाला ओ निगेटिव्ह रक्ताची तातडीने आवश्यकता असल्याचे समजताच सिंधुरक्तमिञ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग चे जिल्हा उपसचिव रविकांत चांदोस्कर व देवगड शाखेचे सचिव प्रकाश जाधव यांच्या प्रयत्नातून जामसंडे येथील रवींद्र पाटील यांनी शिरगाव येथील रक्तदान शिबिरात येऊन त्या मुलासाठी रक्तदान केले.तसेच अमोल हडपिडकर यानी बी पाॅझिटिव्ह रक्ताची आवश्यकता असलेल्या एका रुग्णासाठी रक्तदान केले.