मसुरे | झुंजार पेडणेकर
मुख्यमंत्री पंचायतराज अभियान अंतर्गत आज दिनांक 31 मार्च 2026 रोजी ग्रामसचिवालय कार्यालय सुकळवाड येथे वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सदर उद्घाटन कार्यक्रमास प्रभारी सरपंच श्री.किशोर पेडणेकर,ग्रामपंचायत सदस्य सौ. जानकी पावसकर,सौ.वृषाली गरुड, माजी पंचायत समिती सभापती श्री.अजिंक्य पाताडे, माजी पंचायत समिती उपसभापती श्री.प्रसाद मोरजकर, श्री. सागर कुशे समिती सदस्य, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री सुनील पाताडे,मुख्याध्यापक श्री नांदोसकर सर, समिती सदस्य श्री.हेमंतकुमार पाताडे, श्री. प्रदीप पाताडे, श्री. पंढरी पाताडे, श्री. किरण पाताडे, ग्रामस्थ सौ. धामापूरकर,श्री. भूषण पाताडे,अंगणवाडी सेविका श्रीम. संजना कुशे,ग्रामपंचायत कर्मचारी श्री.अक्षय पाताडे, केंद्रचालक रूपाली बिलये ग्रामपंचायत सफाई कर्मचारी श्री.सुभाष म्हसकर व ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती वेदिका गोसावी या उपस्थित होत्या. माणसाला त्याच्या इच्छित ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी तसेच त्याच्या व्यक्तिमत्वावर चांगले संस्कार करण्यासाठी पुस्तके नेहमीच उपयोगी ठरतात. पुस्तके आपल्या जीवनात महत्त्वाची कामगिरी बजावतात. आजच्या संगणकीय युगात माणूस पुस्तकांपासून दूर होत चालला आहे. म्हणून माणूस व पुस्तक यांच्यामधील प्रेमळ नाते जपायचं असेल तर वाचनालयाची गरज आहे हा हेतू नजरेसमोर ठेवून हे वाचनालय सुरू करण्यात आले आहे.












