SIR प्रक्रियेवरून राजकीय वाद तीव्र
अवैध मतदार नोंदी हटवण्यावर भर देण्याची मागणी
मतदार यादीतील विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) प्रक्रियेवरून राजकीय वातावरण तापले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीएमसीवर घुसखोरांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्याचा आरोप केला आहे. कोलकाता येथे पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी या प्रक्रियेवर आक्षेप घेणाऱ्यांवर प्रश्न उपस्थित केले. तसेच कायदेशीर मार्गाने तक्रारींचे निराकरण शक्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
कोलकाता : मतदार यादीतील विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) प्रक्रियेवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तृणमूल काँग्रेस (TMC) वर घुसखोरांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्याचा कट रचल्याचा आरोप केला आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की, योग्य कारणास्तव नावे हटवण्यात आलेल्या लोकांनी कोणताही विरोध केला नाही, मात्र टीएमसीच या प्रक्रियेवर आक्षेप घेत आहे. त्यांनी प्रश्न उपस्थित केला की, हीच भूमिका का घेतली जात आहे.
फडणवीस म्हणाले की, SIR प्रक्रियेत घटनात्मक तरतुदीनुसार तक्रार निवारणाची व्यवस्था आहे आणि कोणतीही चूक झाल्यास अपील करण्याचा अधिकार उपलब्ध आहे. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निरीक्षणांचे स्वागत केले.
तसेच त्यांनी मत व्यक्त केले की, मृत, स्थलांतरित आणि अनधिकृत मतदारांची नावे यादीतून वगळणे आवश्यक आहे आणि दर 10 वर्षांनी अशी पडताळणी होणे गरजेचे आहे.
या विधानामुळे राजकीय वर्तुळात नव्या वादाला सुरुवात झाली असून SIR प्रक्रिया पुन्हा चर्चेत आली आहे.
प्रहार डिजिटल











