ग्रामपंचायती सक्षम झाल्या पाहिजेत; ग्रामसचिवालयातूनच विकासाला गती – नितेश राणे

सर्व कारभार एकाच इमारतीतून झाल्यास नागरिकांना सुविधा देणे सोपे

 तिर्लोट ग्रामसचिवालय इमारतीचे लोकार्पण उत्साहात

ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग — “ग्रामपंचायती सक्षम झाल्या पाहिजेत. कारण ग्रामपंचायत हीच लोकविकास व ग्रामविकासाची केंद्रे आहेत. गावातील सर्व कारभार एकाच इमारतीतून चालल्यास नागरिकांना सुविधा देणे अधिक सोपे होते. त्यामुळे ग्रामपंचायत इमारती सुस्थितीत असणे ही काळाची गरज आहे,” असे मत सिंधुदुर्गचे पालकमंत्री महाराष्ट्राचे बंदर विकास व मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केले.

 

तिर्लोट (ता. देवगड) येथील ग्रामपंचायत (ग्रामसचिवालय) नव्या इमारतीचे लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी फलकाचे अनावरणही करण्यात आले.

 

कार्यक्रमाला देवगड तालुका सभापती गणेश राणे, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, गटविकास अधिकारी श्री. चव्हाण, तसेच अमोल तेली, रवी पाळेकर सरपंच सौ. रितिका रामकृष्ण जुवाटकर, उपसरपंच श्री. राजन मधुकर घाडी, मंडल अध्यक्ष बंड्या नारकर, बाळ खडपे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे गटनेते संजय बोंबडी भूषण पोकळे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

या नव्या ग्रामसचिवालयामुळे गावातील नागरिकांना विविध शासकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार असून, ग्रामविकासाला अधिक चालना मिळणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.